करमाळा प्रतिनिधी: करमाळा तालुक्यातील राजकारणातील धूरंदर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात असलेले स्व. श्रीराम उर्फ विलासराव आनंदराव पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण येत्या मंगळवारी सहा ऑगस्ट रोजी आहे. त्यानिमित्ताने रक्तदान शिबीर, ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर यांचे किर्तन तसेच स्व.पाटील यांना विशेष श्रध्दांजली अर्पण करणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित रहावे; असे आवाहन बाळासाहेब पाटील, हनुमंतराव पाटील व पाटील परिवाराने केले आहे.वर्षे पोलीस पाटील, ५० वर्षे सोसायटीचे चेअरमन आणि अपवाद वगळता सतत गावची ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवली होती. त्यांनी पंचायत समितीचे सदस्य, उपसभापती तसेच बाजार समितीचे संचालक, आदिनाथचे संचालक, जिल्हा सहकारी बोर्डाचे उपाध्यक्ष अशा विविध पदावर कार्यरत राहून आपला वेगळा ठसा उमटवला होता. तालुक्यातील जनतेच्या मनात काय आहे याचा अचूक अंदाज बांधणारे ते राजकीय धुरंदर म्हणून प्रसिध्द होते. असे पाटील यांचे निधन वयाच्या ९१व्या वर्षी. १८ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले. तिथीनुसार त्यांचे प्रथम पुण्यस्मरणस्व. श्रीराम पाटील यांचा जन्म २१ जानेवारी १९३३ ला झाला. त्यांचे बालपण व शिक्षण हे आजोळी कर्जत (जि. अहमदनगर) येथे झाले. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले आहे. त्यांचा तालुक्यातच नव्हेतर जिल्हा आणि राज्यात अनेक मान्यवरांशी संपर्क होता. या संपर्काच्या जोरावर आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक गरजू माणसास ते आधार देत होते व मदत करत होते. त्यांचा एवढा मोठा जनसंपर्क असतानाही त्यांनी गावाशी नाळ कायम जोडून ठेवलेली होती. ते झरे गाव येथे ६ ऑगस्ट २०२४ ला येत आहे. त्यानुसार झरे येथील राधेश्याम मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार असून या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.