Categories: करमाळा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ३०,९९६ अर्जमंजूर : आमदार संजयमामा शिंदे


करमाळा प्रतिनिधी – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत करमाळा तालुक्यातून आजअखेर आलेल्या ३४,३६२ अर्जापैकी ३०,९९६ अर्ज मंजूर झालेले असून या बहिणींना राखीपोर्णिमेनिमित्त दि.१९ ऑगस्ट रोजी पहिल्या दोन महिन्यांचे म्हणजेच प्रत्येकी ३,००० रुपये वितरित केले जाणार असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे तर २,४१६ अर्ज फेर सादर करण्यात आलेले आहेत. तसेच सर्व अर्जाना मंजुरी देणारा करमाळा हा राज्यातील पहिलाच तालुका ठरला असल्याची माहिती यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी दिली.
या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत असल्याने जास्तीजास्त बहिणींनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले असून ही योजना प्रभावीपणे राबविण्याकामी प्रयत्न करणाऱ्या या योजनेच्या तालुकास्तरीय समितीच्या सदस्य-सचिव तथा तहसीलदार शिल्पा ठोकडे,पं.स.गटविकासाधिकारी मनोज राऊत,संबंधित सर्व अधिकारी,कर्मचारी,सर्व ग्रामपंचायतींचे ऑपरेटर्स, अंगणवाडी सेविका,कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

5 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

8 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 day ago