Categories: करमाळा

मराठा व ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरी शैक्षणिक विकासासाठी शासनाने आरक्षणासंदर्भात अटी शिथिल करून न्याय देण्याची प्राध्यापक रामदास झोळ यांची मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मागणी

*करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले असून शासनाने मराठा व ओबीसी सवलती शिथील कराव्यात अशी मागणी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांनी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अंतरवली सराटी येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेऊन वाढदिवसानिम्मित सत्कार करून दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी शैक्षणिक धोरणाबाबत प्राध्यापक रामदास झोळसर म्हणाले की मराठा ओबीसी समाजाला जातपडताळणी शैक्षणिक अडचणी येत आहेत वस्तीगृह भत्ता याबाबत शासनाने अटी शिथिल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले .याबाबत आपण आवाज उठवल्यानंतर सकारात्मक निर्णय होईल.याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर येथे सात ऑगस्टला होणाऱ्या शांतता रॅली संदर्भात चर्चा करण्यात आली .यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, प्रशांत नाईकनवरे ,निलेश शिंदे ,सुहास काळे पाटील, भीमराव ननवरे हे उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक रामदास झोळ यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी नोकरी, शिक्षण व आरक्षण यामध्ये सध्या उद्भवत असलेल्या अडचणी या मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये,*
1. सामान्य प्रशासन विभागाने जात पडताळणी बाबत काढलेल्या शासन निर्णयामध्ये फक्त SEBC च्या विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदत दिलेली आहे. ती मुदतवाढ सरसकट सर्व मागासवर्गीय जातींना देण्यात यावी.
2. बहुजन समाज कल्याण विभागाने 14 जून 2024 रोजी काढलेला 1554 अभ्यासक्रमा बाबतचा शासन निर्णय SEBC,EWS व OPEN च्या विद्यार्थ्यांना लागू करावा.
3. केंद्र सरकारचे EWS आरक्षण SEBC च्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागू करावे.
4. OBC च्या विद्यार्थ्यांना वस्तीग्रह भत्ता डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीग्रह भत्याप्रमाणे सरसकट लागू करावा.
इत्यादी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.असुन याबाबत शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षणासाठी नोकरीसाठी आरक्षणासंदर्भात अटी शिथिल करून या समाजाला न्याय मिळवून देऊ असा विश्वास मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला असल्याचे सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

15 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

16 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

2 days ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

3 days ago