Categories: करमाळा

जिद्द चिकाटी, परिश्रम, योग्य संस्कार,व शिक्षण मिळाल्यास यश निश्चित असुन कु निकीता बागल हिने मिळवलेले यश कौतुकास्पद – प्राध्यापक रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी जिद्द चिकाटी, परिश्रम, योग्य संस्कार व शिक्षण मिळाल्यास यश निश्चीत असुन कु. निकिता रामदास बागल तिने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे, असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी त्याला योग्य संस्कार व शिक्षण दिले तर नक्कीच कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करता येते ‍.कु .निकिता रामदास बागल हिने मिळवलेली यश नक्कीच युवा पिढीसाठी प्रेरणादायी असुन भावी पिढीने तिचा आदर्श घेऊन आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यतत्पर होण्याची आवाहन त्यांनी केले. दत्तकला शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी असलेल्या पोमलवाडीची कु. निकिता रामदास बागल हिने इ. ०८ वी. ते बी. फार्म पर्यंत दत्तकला शिक्षण संस्था येथे शिक्षण घेतले असून, उच्च अधिकारी होण्याची तिचे ध्येय व स्वप्न होते ते तिने जिद्द, चिकाटी, परिश्रम सातत्य याच्या जोरावर यश मिळवले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या औषध निर्माण अधिकारी म्हणुन तिने यश मिळवलेले आहे . तिच्या या यशाबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सचिवा सौ. मायाताई झोळ मॅडम प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर दत्तकला शिक्षण संस्था सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी तिचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात श्री संत नामदेव शिंपी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय प्रारंभ११ ऑगस्ट रोजी संजीवन समाधी सोहळा महाप्रसाद,

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…

1 day ago

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित विशाल महाराज खोले यांचा ‘आई-वडील हेच खरे दैवत’चा हृदयस्पर्शी संदेश

करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…

1 day ago

शाहुनगर पाणीप्रश्नाला मोठा दिलासा; नवीन चार इंची पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ उत्साहात नगरपरिषदेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…

1 day ago

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

3 days ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

3 days ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

3 days ago