Categories: करमाळा

अखेर पोटेगाव बंधारा दुरुस्तीच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली… अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यास आमदार संजयमामा शिंदे यांना यश


करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पोटेगावच्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ८ लाख निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध होऊन ऑक्टोबर २०२४ पूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती करमाळा मतदारसंघाचे आ.संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले की, पोटेगाव हा अत्यंत महत्त्वाचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा अनेक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेमध्ये होता. सिंचन बजेट मधून त्याला दुरुस्ती करण्यास निधी उपलब्ध नसल्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांना आपण विस्तार सुधार मधून त्याचा प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता श्री धुमाळ यांनी १५ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष पोटेगाव बंधाऱ्याची पाहणी केली त्यानंतर प्रस्ताव दाखल होऊन २५ नोव्हेंबर २०२२ रोजी च्या कार्यकारी समितीच्या १६६ व्या बैठकीत सदर प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन प्रस्ताव नियामक मंडळापुढे मांडण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये शासनास सादर करण्यात आला.
प्रस्ताव दाखल झालेला होता परंतु जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळाची बैठक होत नसल्यामुळे विषय प्रलंबित होता, त्यामुळे दिनांक ७ मार्च २०२३ रोजी फडणवीस साहेबांना आपण लेखी पत्र देऊन नियामक मंडळाची बैठक लवकरात लवकर घेऊन पोटेगाव या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा विषय मार्गी लावावा अशी विनंती केली होती.महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ११०वी बैठक २८ डिसेंबर २०२३ रोजी झाली आणि त्यामध्ये ४१२.९२ लक्ष निधीला मंजूर देण्यात आली.आज
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग,शासन निर्णय क्रमांक: प्रमाप्र-२०२४/ (प्र.क्र.२१९/२०२४)/ सिंव्य दिनांक:- ७ ऑगस्ट, २०२४ रोजी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ८ लाख निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली.या निधीमधून पोटेगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.या बंधार्‍याचा फायदा पोटेगाव, बाळेवाडी पोथरे ,बिटरगाव श्री, तरटगाव ,निलज या ६ गावांना होणार असून एकूण ८१५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
…
चौकट…
पोटेगाव बंधाऱ्याचा इतिहास…
पोटेगाव या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी दिनांक २१ एप्रिल १९८१ च्या शासन निर्णयानुसार २४ लाख ६१ हजार इतक्या किमतीस प्रशासकीय मान्यता दिलेली होती. सदर काम जानेवारी १९८८ मध्ये सुरू होऊन ऑगस्ट १९९० मध्ये पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्प सिंचन व्यवस्थापन विभागाकडे सन १९९३ मध्ये हस्तांतरित करण्यात आला होता.तेंव्हापासून हा बंधारा दुरूस्ती च्या प्रतिक्षेत होता.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago