Categories: करमाळा

उजनी धरण 100% भरल्याने उजनी धरणग्रस्त समितीच्यावतीने खणा नारळाने ओटी भरून पाण्याचे पुजन

करमाळा प्रतिनिधी – उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतर तालुक्यातील उजनी धरणग्रस्तांनी ढोकरी येथे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या सह वांगी पंचक्रोशीतील मान्यवरांच्या हस्ते खणा नारळांनी ओटी भरून हलगीच्या कडकडात मोठ्या उत्साहात पूजन केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या , उजनी धरणग्रस्तांनी उजनीच्या निर्मिती साठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या त्यागातूनच त्यागातूनच उजनी जलाशय काठावर तसेच लाभक्षेत्रातील शेती ,गावे ,सम्रुद्ध झाली असून अहिल्यानगर , सोलापूर, पुणे आदि जिल्ह्यात विकासाची गंगा वाहत आहे .त्यांच्या बद्दल क्रज्ञता व्यक्त करणे आपले उत्तरदायित्व आहे . गत वर्षी अल्प पावसाने पाणी टंचाई निर्माण झाली होती. उजनी काठावरील शेती ,पाणी पुरवठा योजना धोक्यात आली होती. परंतु जून पासून च पुणे परिसरातील घाटमाथ्यावर पाऊस पडू लागल्याने उजनी लवकरच शंभर टक्के भरले. उजनी धरणग्रस्तांनी पाणी पूजनाच्या निमित्ताने आज ज्यांनी उजनी साठी त्याग केलेल्या लोकांचे स्मरण केले याचा व उजनी जलाशयास भेट दिल्याचा मोठा आनंद वाटतो.प्रास्ताविकात कार्यक्रमाचे संयोजक उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजी बंडगर यांनी उजनी जलाशयातील 123 टी एम सी पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर दिला. उजनी धरणग्रस्तांच्या हक्काचे पाणी बेसुमार ,नियोजन बाह्य व बेकायदेशीर पणे सोडण्यामुळे त्यांना टंचाई काळात मिळत नाही. हा उजनीचे खरे मालक असलेल्या धरणग्रस्तांवर अन्याय आहे. जलपूजनाच्या निमित्ताने उजनी साठी त्याग केलेल्या लोकांचे स्मरण करणे , पाण्याच्या योग्य नियोजनाचा आग्रह धरणे , आणि निसर्गाबद्दल क्रज्ञता व्यक्त करणे हा उद्देश असतो.उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचालन अर्जुन आबा तकीक यांनी केले तर आभार महेंद्र पाटील यांनी मानले.या कार्यक्रमास आदिनाथ चे उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष भारत साळुंके ,यांच्या सह उजनी धरण व्यवस्थापन कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता समाधान डुबल ,सहाय्यक अभियंता प्रणाली माने ,मंडलाधिकारी प्रशांत जगताप ,वांगीचे सरपंच संतोष देशमुख, माजी सरपंच विठ्ठल शेळके , दत्ता बापू देशमुख, बाजार समितीचे माजी संचालक बापूराव रणशिंग ,वांगी सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र देशमुख, संचालक विकास पाटील , नितीन पाटील , अप्पासाहेब भोसले , पाटील , सुधीर देशमुख, शेतकरी नेते हनु यादव, गौतम नाना मोरे ,वांगी चार भिवरवाडीचे उपसरपंच डाॅक्टर भाऊसाहेब शेळके , सदस्य अमर आरकिले , परशूराम जाधव ,मामा मांढरे , तलाठी बायनेवाड , ढोकरीचे सरपंच अनिल वळसे , माजी सरपंच देवा पाटील, महादेव वाघमोडे , काकासाहेब बोरकर,काकासाहेब पाटील ,अनिल बोरकर, नवनाथ वाघमोडे , समाधान वळसे , सतीश चौगुले , हनुमंत वळसे ,अंकुश नरूटे , भरत खरात ,संजय आरकिले ,सुग्रीव नलवडे , बालाजी मंगवडे ,अंकुश सांगवे , जगन्नाथ सांगवे ,आबा सांगवे ,सुभाष वळसे , मच्छिंद्र पाटील आदी उपस्थित होते.                                                   महिला प्रतिनीधी सौ वर्षा बंडगर, सिंधू खरात , समाताई चौगुले ,कावीरा गडदे ,कोमल देवकते,अंकीता चौगुलेयांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच औक्षण केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभियंता संघटनेचे अध्यक्ष शुभम बंडगर, नागनाथ देवकते ,मधूकर देवकते ,भैय्या वाघमोडे, आशिष बंडगर, आदित्य बंडगर, सौरभ सलगर ,चैतन्य पाटील आदिंनी प्रयत्न केले.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

21 hours ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

1 day ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

6 days ago