करमाळा प्रतिनिधी
2019 ते 2024 या कालावधीत आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यासाठी जवळपास अडीच हजार कोटीहून अधिक निधी मंजूर करून आणला असून त्या कामांच्या उद्घाटनाची सुरुवात सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 पासून होत असून या दिवशी तीर्थक्षेत्र आदिनाथ महाराज संगोबा येथे सकाळी 10 वाजता रस्त्यांच्या व घाटाच्या विकास कामांचे भूमिपूजन करून होत आहे.
उद्या जवळपास 20 कोटी निधी मंजूर असलेल्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने करमाळा बोरगाव घारगाव ते जिल्हा रस्ता प्रजिमा 5 – 4 कोटी 50 लाख ,बोरगाव ते निलज रस्ता ग्रामा 81 – 2 कोटी,प्रधानमंत्री ग्रामसडक योजना रामा 68 ते सटवाई वस्ती निलज ते बिटरगाव श्री रस्ता – 3 कोटी 28 लाख ,पर्यटन विभाग – संगोबा घाट बांधणे – 90 लाख,आवाटी सबस्टेशन – लोकार्पण सोहळा – 4 कोटी ,आवाटी दर्गा वॉल कंपाऊंड भूमिपूजन – 99 लाख,गौंडरे फाटा ते नेरले रस्ता भूमिपूजन – 2 कोटी 85 लाख,फिसरे हिसरे हिवरे ते कोळगाव इजिमा 8 रस्ता – 2 कोटी या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या रस्ता कामांचे तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक व पर्यटन विभागाकडून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत आहे.
उद्या होणाऱ्या या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन निलज ,बोरगाव ,घारगाव ,तरडगाव ,बाळेवाडी, गौंडरे, नेरले, हिवरे ,आवाटी, कोळगाव ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…