करमाळा प्रतिनिधी
२०१९ नंतर करमाळा मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून आपण तालुक्यात विकासाचे राजकारण केले. एखादी गोष्ट होत असेल तर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व ती कामे मार्गी लावली. परंतु एखादी न होणारी गोष्ट विनाकारण लोकांना खोट्या भूलथापा देऊन फसवणूक करणे हे काम मी केलं नाही आणि मी तसले राजकारण करतही नाही. त्यामुळेच २०१९ ते २०२४ या या कार्यकाळात मतदार संघात भूसंपादन, सिंचन, रस्ते ,वीज ,आरोग्य ,शिक्षण व प्रशासन या कामासाठी जवळपास ३ हजार कोटी निधी आपण उपलब्ध केला असल्याचे प्रतिपादन आमदार संजय मामा शिंदे यांनी केले.
आज मान्यवरांच्या हस्ते करमाळा बोरगाव घारगाव ते जिल्हा रस्ता प्रजिमा 5 – 4 कोटी 50 लाख ,बोरगाव ते निलज रस्ता ग्रामा 81 – 2 कोटी,प्रधानमंत्री ग्रामसडक योजना रामा 68 ते सटवाई वस्ती निलज ते बिटरगाव श्री रस्ता – 3 कोटी 28 लाख ,पर्यटन विभाग – संगोबा घाट -90 लाख, आवाटी दर्गा वॉल कंपाऊंड – 99 लाख,गौंडरे फाटा ते नेरले रस्ता- 2 कोटी 85 लाख,फिसरे हिसरे हिवरे ते कोळगाव इजिमा 8 रस्ता – 2 कोटी या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या रस्ता कामांचे तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक व पर्यटन विभागाकडून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. यावेळी विनय ननवरे, एड. राहुल सावंत ,गौतम ढाणे, चंद्रकांत सरडे, भरत अवताडे यांनी मनोगते व्यक्त केली. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी राजेंद्र बाबर ,एड. आजीत विघ्णे, दादासाहेब सावंत, मानसिंग खंडागळे, अशोक पाटील, अशपाक जमादार, अभिषेक आव्हाड, शहाजी झिंजाडे, युवराज गपाट ,दत्तात्रय अडसूळ ,राजेंद्र धांडे, तात्या पाटील, राजेंद्र पवार, सुहास रोकडे ,सतीश शेळके, मयूर रोकडे ,बापू तांबे, बबनराव मुरुमकर, आशिष गायकवाड, भरत अवताडे ,सुजित बागल, परमेश्वर भोगल, गौतम ढाणे, नानासाहेब मोरे, पोपट सरडे ,संतोष गायकवाड ,भोजराज सुरवसे यांचे सह तालुक्यातील निलज ,बोरगाव ,घारगाव ,तरडगाव ,बाळेवाडी, गौंडरे, नेरले, हिवरे ,आवाटी, कोळगाव,पोथरे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…