यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, राजे रावरंभा शेतकरी कंपनी केळी या मुख्य पिकावरती काम करत असली तरी केळी या पिकाबरोबरच तूर आणि उडीद या पिकांचे विषमुक्त उत्पादन घेण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, परभणी कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र सोलापूर ,मोहोळ यांच्याकडून बियाणे व बीज प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य व मित्र बुरशी खरेदी करण्यासाठी सुरू असलेली त्यांची धावपळ ही आगळीवेगळी गोष्ट आहे.केवळ नफा कमवणे हा उद्देश न ठेवता विषमुक्त उत्पादन घेणे आणि त्यासाठी ग्राउंड लेव्हलला काम करणे हे सोप्प काम नाही परंतु हे अवघड शिवधनुष्य पेलण्याचे काम ही कंपनी करत असून याची नोंद कृषी इतिहासामध्ये निश्चितच ठेवली जाईल असे उद्गार त्यांनी काढले.
एखाद्या कंपनीचं २ वर्ष वय म्हणजे तसं रांगण्याचे वय असते, परंतु अवघ्या या २ वर्षांमध्ये कंपनीने ३ कोटी रुपयांची उलाढाल केलेली असून याची दखल केंद्र सरकारने घेतली आणि १५ ऑगस्ट २०२३ या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान कार्यालयाने लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण समारंभासाठी या कंपनीला निमंत्रण पाठवले यावरूनच या कंपनीच्या कामाची व्याप्ती आणि आवाका लक्षात येतो. भविष्यकाळात सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक ही कंपनी राजे रावरंभा शेतकरी कंपनीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारा असून कंपनीला दिशा देण्याचे काम आमची कंपनी करणार असल्याचे मतही त्यांनी मांडले. यावेळी पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वय प्रतिक गुरव यांच्या हस्ते श्री सचिन वाळुंज यांचा सन्मान करण्यात आला. यावेळेस राहुल पाटील, अमर दरेकर ,कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर, हनुमंत नलवडे ,अजित काटुळे, वैभव शिंदे, विवेक जाधव, राहुल गोरे आदी उपस्थित होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…