Categories: Uncategorized

प्रा. डॉ.महेश निकत सर यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त सह्याद्री रत्न पुरस्कार जाहीर

करमाळा प्रतिनिधी 
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, भारत सरकार सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय या विभागात नोंदणीकृत असलेल्या सह्याद्री रत्न महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत समाज, संस्कृती, यांचे संवर्धन व लोकशाही विचारांना एकत्र करणारा आणि जगण्याला ध्येय बनवणाऱ्या ऐतिहासिक गुणवत्तेचा सर्वश्रेष्ठ सन्मान व “सह्याद्री रत्न पुरस्कार वितरण सोहळा” पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या सह्याद्री रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा चे संस्थापक प्रा डॉ महेश निकत सर यांना या सह्याद्री रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात येणारा “सह्याद्री रत्न पुरस्कार” २०२४ हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे . प्रा डॉ निकत सर यांनी करमाळा सारख्या शिक्षणापासून वंचित असलेल्या तालुक्यातील शिक्षण , सामाजिक तसेच झाडे लावा झाडे जगवा , अपघात ग्रस्त लोकांना मदत करणे अश्या अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अत्यंत मानाचा समजला जाणारा “सह्याद्री रत्न पुरस्कार” २०२४ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती सह्याद्री रत्न महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. दिपक जाधव यांच्या कडून निवड पत्राद्वारे देण्यात आली आहे. सह्याद्री रत्न महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या निवड समितीने प्रा डॉ निकत सर यांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे. तसेच याच पुरस्कार वितरण सोहळ्याच्या व्यासपीठावरती ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या सह्याद्री रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात साहित्य, कला, सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक, उद्योग, पर्यटन, अपंग निराधार महिला, वन्यजीव, व्यवसाय, शैक्षणिक, आरोग्य, सार्वजनिक सेवा, स्वायत्त संस्था, सहकार, पत्रकारिता, कृषी अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने उत्तुंग शिखर गाठलेल्या, पैशाला महत्त्व आलेल्या जगात जनसेवेचे व्रत घेतलेल्या व त्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या व सेवेसाठी आपले आयुष्य व्यतीत करणाऱ्या सन्मान मूर्तीना विविध क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. उदात्त हेतूने निस्वार्थीपणे कार्य करणारी माणसे, दखल घेतल्या न गेलेल्या अव्याहतपणे राबणाऱ्या अदृश्य हातांना सन्मानित करून पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम पुरस्काराच्या निमित्ताने सह्याद्री रत्न महाराष्ट्र राज्य ही संस्था करणार आहे. हा या संस्थेचा या पाठीमागचा उदात्त हेतू आहे.या पुरस्काराचे स्वरूप फेटा, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, मेडल असे आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत वार रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी पत्रकार भवन, पुणे या ठिकाणी पार पडणार आहे. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. दिपक जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

11 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

12 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

1 day ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago