Categories: करमाळा

काँग्रेस (इंटक) सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी अमोल जाधव यांची निवड

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस (इंटक) सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी करमाळा येथील अमोल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ संजीवजी रेड्डी यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ कैलास (भाऊ) कदम व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी संघटनात्मक घोषणापत्र देऊन केली.निवडीनंतर जाधव म्हणाले प्रत्येक तालुक्यातील, गावातील तसेच शहरातील संघटित असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी व संघटना वाढीसाठी प्रयत्न करुन संघटना वाढवील तसेच महाराष्ट्र इंटकचा नावलौकिक वाढवून संघटना वाढीसाठी प्रयत्न करुन नागरिकांना काँग्रेस (इंटक) पक्षाचे लक्ष व धोरणे समजावून काँग्रेस (इंटक) चे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम तन मन धनाने करेन.निवडीनंतर काँग्रेस (इंटक) जिल्हा व राज्याचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे जाधव यांना शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या जाधव यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago