Categories: करमाळा

माजी आमदार नारायण (आबा ) पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जेऊर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी माजी आमदार नारायण (आबा ) पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जेऊर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी जी कोळसे-पाटील यांच्या हस्ते नारायण (आबा ) पाटील यांचा सत्कार होणार आहे. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार रोहित पवार व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती प्रा डॉ. संजय चौधरी यांनी दिली. यावेळी पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा. अर्जुन सरक, सरपंच पृथ्वीराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल उपस्थित होते. वाढदिवसाच्या कार्यक्रमांची अधिक माहिती देताना प्रा डॉ. संजय चौधरी यांनी सांगितले की शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचा वाढदिवस असून दिनांक 22 आणि 23 ऑगस्ट रोजी जेऊर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 22 रोजी भारत महाविद्यालय आयोजित कर्मयोगी व्याख्यानमाले (वर्ष 14 वे) मध्ये नामांकित राजकीय विश्लेषक व पत्रकार मा. संजय आवटे यांचे व्याख्यान सकाळी 10 वाजता होणार आहे.”महाराष्ट्राचा नाद नाय करायचा ” या विषयावर मा. संजय आवटे हे विचार व्यक्त करतील. तर सकाळी 9 वाजता मिनी मॅरेथॉन (10 किमी ) धावण्याची स्पर्धा होणार आहे. यातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 15 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार असून तब्ब्ल 25 विजेत्या स्पर्धाकांना सुध्दा बक्षिसे दिली जाणार आहेत. युवानेते पृथ्वीराज पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तर शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांचे दुपारी दोन कजता व्याख्यान होणार आहे. तसेच जेऊर ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या भव्य नागरी सत्कार संपन्न होणार आहे. हा सत्कार सोहळा दुपारी ठीक 2 वाजता कर्मयोगी गोविंदबापू पाटील सभागृह ( बाजारतळ) येथे होईल. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तरी करमाळा माढा विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आव्हान संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

8 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

22 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

1 day ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago