Categories: करमाळा

देशसेवेसाठी समर्पित सैनिकांचा सन्मान करणारे नेतृत्व:-आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी 
आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटनेसाठी करमाळा मतदारसंघाचे लोकप्रिय व विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांनी मंजूर करवून घेतलेल्या कारगिल भवन या वास्तूचे भूमिपूजन दि.१६ ऑगस्ट रोजी मामांच्या हस्ते,सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व संघटनेचे सर्व सदस्य,वारसदार सदस्य यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक संपन्न झाले आणि आम्हा सर्वांचा ऊर अक्षरशः अभिमानाने व कौतुकाने भरून आला.कारण संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात प्रथम आम्हा सैनिकांसाठी हक्काचे कारगिल भवन,त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणारे मामा हे आजतरी एकमेव आमदार ठरलेले आहेत.
या कामी आमच्या संघटनेला करमाळा पालिकेचे मुख्याधिकारी महेश तपसे,नगररचनाकार शशांक भोसले,अभियंता अक्षय वाघमारे,तहसीलदार शिल्पा ठोकडे,यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे-पाटील,सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता के.एम.उबाळे,गटविकासाधिकारी मनोज राऊत,संजयमामांचे समर्थक व मकाईचे माजी संचालक विवेक येवले,कॉन्ट्रॅक्टर प्रवीण शहाणे आदींचे बहुमोल सहकार्य लाभले हे नमूद करणे आवश्यक आहे. या समारंभास राज्य त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष अंकुश खोटे,परंडा तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संभाजी पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भरत अवताडे,जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड,लिंबेवाडी सरपंच किरण फुंदे,श्री देवीचामाळ माजी उपसरपंच अनिल पवार,कुंभेजचे बाबासाहेब माळी,संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र सव्वासे,सचिव बिभीषण कन्हेरे,सहसचिव किरण ढेरे,निलंगे काका व संघटनेचे सर्व सदस्य,वारसदार उपस्थित होते.या निमित्ताने मी इतकंच म्हणेन की,मामांसारखे कर्तबगार आमदार प्रत्येक मतदारसंघाला लाभावेत…त्यांच्या हातून आम्हा सैनिकांच्या देशसेवेचे सार्थक व्हावे !
*_अक्रूर शिंदे*
आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटना – करमाळा तालुका

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

9 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

22 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

1 day ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago