करमाळा प्रतिनिधी आमदार.संजयमामा शिंदे यांचे नेतृत्व करमाळा तालुक्याला लाभदायी आहे- युवक कार्यकर्त्यांमधे विश्वास निर्माण झाला आहे..असे मत ॲड अजित विघ्ने यांनी व्यक्त केले आहे. मौजे. खातगाव येथील कार्यकर्ता संगठन बैठकीत व्यक्त केला आहे.
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील मौजे खातगाव ता करमाळा येथे युवक संघटक ॲड. अजित विघ्ने, संघटक राजेंद्र बाबर यांचे उपस्थितीत कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अनेक युवक मंडळी व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. करमाळा तालुक्यात पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, पर्यटन यासह विविध योजनांचा निधी मंजुर झालेला असुन, त्याची कामे मार्गस्थ होत आहेत. कोव्हीड चा कालावधी, सरकारची उलथापालथ होऊनही अपक्ष असणारे आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेली विकासाची कामे करमाळा तालुक्याला प्रगतीचे मार्गावर ठरणारी आहेत. डिकसळ कोंढार चिंचोली सारख्या अत्यंत जिव्हाळ्याचा असणाऱ्या पुलाचे महत्वाचे काम मार्गी लागलेले असुन, पश्चिम भागातील सर्वसामान्यांची अनेक छोटी मोठी कामे मामासाहेबां कडुन चुटकीसरशी पार पडत आहेत. त्यात आमदार साहेब फक्त विकासकामांवर फोकस करत असुन कोणत्याही विरोधकांवर टिका टिप्पणीत वेळ घालवत नाहीत. जनता दरबाराच्या माध्यमातुन व फोन वर चोविस तास सर्वसामान्य माणुस मामांच्या कायम संपर्कात राहीलेला आहे. याबाबतही जनसामान्यात चांगल्या प्रतिक्रीया उमटत आहेत.२०२४ च्या विधानसभेची रणधुमाळी लवकरच सुरू होत असुन आमदार संजयमामा शिंदे यांचे नेतृत्व हे करमाळा तालुक्यात सक्षम नेतृत्व म्हणुन सिध्द झाले असुन आमदारकीची माळ पुन्हा एकदा आमदार. संजयमामा शिंदे यांचे गळ्यात पाडण्यासाठी गावोगावचे युवक कार्यकर्ते सरसावत आहेत. संपुर्ण करमाळा तालुक्यात कार्यकर्ता संगठन बैठका होणार असुन या बैठकांचे माध्यमातुन नविन कार्यकर्ते युवक मंडळी आमदार संजयमामा शिंदे यांचे विकासप्रक्रियेत सामिल होणार आहेत. याबाबतची माहिती युवक संघटक ॲड. अजित विघ्ने यांनी दिली आहे.