Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील गटा तटाच्या राजकारणाला तिलांजली देऊन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रा. रामदास झोळ सर यांना विधानसभेसाठी हिंगणी ग्रामस्थांच्यावतीने जाहीर पाठिंबा- मा. सरपंच हनुमंत पाटील

 करमाळा प्रतिनिधी,
करमाळा तालुका गटातटाच्या राजकारणाला कंटाळला असून सर्वसामान्य जनता, शेतकरी यांना ‌ न्याय देऊन विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रा. रामदास झोळ सर यांना हिंगणी ‌ गावाचा जाहीर पाठिंबा देत असल्याचे मत हिंगणी गावचे माजी सरपंच हनुमंत पाटील यांनी व्यक्त केले. हिंगणी गावामध्ये प्रा. रामदास झोळ सर यांचा ग्रामस्थांच्यावतीने जन संवाद मेळावा २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये विविध गटामधील कार्यकर्त्यांनी करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रा. रामदास झोळ सर यांना पाठिंबा देऊन झोळ परिवारामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी हिंगणी ग्रामस्थांच्या जनसंवाद दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आपण शैक्षणिक संकुलाची उभारणी करून विद्यार्थ्यांना ‌ न्याय देण्याचे काम केले आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळून देऊन त्यांच्या बिलासाठी आंदोलन करून न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. करमाळा तालुक्यातील विकासाच्या प्रश्नावर आपण येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असून करमाळा तालुक्यातील वीज, रस्ते पाणी व आरोग्य याचबरोबर रोजगार निर्मिती करण्यासाठी एमआयडिसी च्या माध्यमातून विविध उद्योग आणून शिक्षणाची सोय करण्यासाठी मोठे शिक्षण संकुल उभा करणार आहे. त्यामुळे करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मला मतदान रुपी आशीर्वाद देताल अशी मला खात्री आहे . आपण टाकलेला विश्वास मी नक्कीच सार्थ करून असा विश्वास प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केला आहे.
हिंगणी गावचे माजी सरपंच हनुमंत (तात्या )पाटील यांचा व सर्व समर्थकांना घेऊन प्रा. रामदास झोळ सर यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला आहे. यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्याध्यक्ष (सोलापूर जिल्हा) रवी गोडगे तसेच गावातील गणेश बाबर (वस्ताद ), अंगद बाबर यांनीही कार्यकर्त्यांना घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद शाळा समिती व्यवस्थापन माजी अध्यक्ष प्रवीण बाबर, विविध कार्यकारी सोसायटी हिंगणी माजी संचालक तानाजी बाबर, दत्तात्रेय तावरे, रज्जाक शेख, नामदेव बाबर तसेच माजी सदस्य ग्रामपंचायत हिंगणी रज्जाक शेख, हरी रोकडे, रोहिदास डोकडे, परशुराम शिंदे, किसन बाबर, शाम जाधव, ग्रामपंचायत सदस्य जयकुमार गलांडे व हिंगणी गावातील ग्रामस्थ हिरालाल गायकवाड, शब्बीर शेख, रफिक शेख, रज्जाक शेख, अक्षय मोरे, अक्षय तुपे, नवनाथ बाबर, अंकुश बाबर, अमोल बाबर, हरी रोकडे, ज्ञानदेव गायकवाड, गणेश बाबर, बापूसाहेब बाबर, रावसाहेब बाबर, सोमनाथ बाबर, रवींद्र बाबर, अशोक बाबर, योगेश बाबर, गणेश गायकवाड, जीवन गायकवाड, समाधान गुरव, शाहरुख इनामदार, रोहिदास रोकडे, सागर जाधव, आकाश बाबर, शिवाजी बाबर,अजय गुरव, रामचंद जाधव, नामदेव धनावडे, शिवाजी जाधव, गणेश सर्जे, बिभीषण धनावडे,अमोल पाटील, उमेश सर्जे, सुरज शेख, तौफिक शेख, अमर जाधव, राजेंद्र बाबर आणि सर्व कार्यकर्तेनी पाठिंबा दर्शिवला आहे. हलगीचा नाद करत मोठ्या जल्लोषात विकासप्रिय सुशिक्षित नेतृत्व असलेले प्रा. रामदास झोळ सर यांचे हिंगणी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले असून
झोळ सर यांना गावातून जास्तीत जास्त मतदान देऊ अशी ग्वाही हिंगणी ग्रामस्थांनी दिली आहे.. या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रा. रामदास झोळ सर त्यांच्या धर्म पत्नी सौ. मायाताई झोळ मॅडम यांचे करमाळा तालुक्यातून उस्फुर्त स्वागत होत असून आता विकासासाठी जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. हिंगणी ग्रामस्थांमधून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा हिच खरी यशाची नांदी नक्कीच ठरणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

3 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

4 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

1 day ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

1 day ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

1 day ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago