करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील करमाळा शहरातील कानाड गल्ली येथील माजी नगरसेवक तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम (दादा) राखुंडे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. आज सकाळी त्यांच्या घरच्यांनी दरवाजा उघडला तेव्हा ही घटना उघडकीस आली. मराठा आरक्षण मिळावे व आपला मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे असे पत्र लिहून राखुंडे यांनी आत्महत्या केली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम (दादा) राखुंडे हे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून हताश व निराश होते. नेहमीच ते सामाजिक चळवळींमध्ये सहभागी असायचे मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्येही राखुंडे सहभागी होते. सध्या राज्यात असलेल्या आरक्षणाच्या संदर्भात राज्यभर आंदोलन चालू असताना टोकाची भूमिका घेत राखुंडे यांनी यावेळी एक चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे आणि याबाबत कोणीही तक्रार करू नये असा ही उल्लेख केला आहे .मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा असल्याचेही चिठ्ठी मध्ये लिहिले आहे. आज पर्यंत मराठा आरक्षणासाठी तरुणांनी आत्महत्या केल्याचे पाहिले आहे. परंतु आज ८० वर्षीय राखुंडे यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेली आहे.
सरकारने बलभीम दादा राखुंडे यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता मराठा आरक्षण विषयी योग्य तो निर्णय घ्यावा जेणेकरून भविष्यात तरुण किंवा वृद्ध कोणीही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नये असे मत राखुंडे परिवाराने सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त केले आहे.करमाळा शहरातील व तालुक्यातील सर्व मराठा समाज बलभीम दादा राखुंडे यांच्या आत्महत्यामुळे संतप्त झालेला आहे .करमाळा शहरात शोककळा पसरली असुन वातावरण शोकाकूल झाले आहे .
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…