करमाळा प्रतिनिधी
भाजपाचे नेते गणेश चिवटे हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नेतृत्व आहे असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी केले ,भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने झरे येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला.
पुढे बोलताना ते म्हणाले की गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात करमाळा तालुक्यातील भाजपा संघटन मजबूत झाले असून श्री चिवटे यांनी आता तालुक्याचे राजकीय नेतृत्व करावे व तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील आपल्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण चिवटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे सांगितले,
यावेळी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष उमेश मगर, बंडू शिंदे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार यांचीही भाषणे झाली. यावेळी त्यांनी झरे व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या योजनांची माहिती व त्यांच्या लाभाविषयी मार्गदर्शन केले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांनी केले तर आभार किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घाडगे यांनी मानले,
या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पै अफसर तात्या जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे , शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल,माळशिरसचे बाळासाहेब वावरे , तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे,नितीन झिंजाडे, बिटरगाव चे माजी सरपंच डॉ.अभिजीत मुरूमकर, सहकार सेलचे तालुकाध्यक्ष आजिनाथ सुरवसे, संतोष कुलकर्णी ,लक्ष्मण शेंडगे, बिभीषण गव्हाणे, हनुमंत रणदिवे, गणेश माने, हरिभाऊ झिंजाडे, विष्णू रंदवे, दौलत वाघमोडे, हर्षद गाडे, समाधान कांबळे, अशोक ढेरे, प्रकाश ननवरे, सुनिल जाधव, सुनील नेटके, नितीन निकम, संदिप काळे, दत्ता एकाड, दादा गाडे, ईश्वर मोरे, किसान मोर्चाचे गणेश परदेशी, जयसिंग भोगे ,शिवाजी नाळे, अनिल गायकवाड, हर्षल शिंगाडे , अमोल दुरंदे , शिवाजी बोराडे, मोहन नेटके , बाबु गायकवाड, गणेश वाळुंजकर, बापू मोहोळकर यांच्यासह झरे येथील भरत भाऊ घाडगे , नानासाहेब घाडगे, हनुमंत शिंदे ,खंडू पिसाळ, शंकर घाडगे, बाबू व्यवहारे, राम गुळवे , किरण शिंदे, प्रविण शिंदे, उत्तरेश्वर शेळके ,नाना कांबळे , माजी सरपंच शिवाजी पिसाळ ,राजू गायकवाड, शिवाजी ढावरे, विजय ढावरे, विठ्ठल घाडगे, शिवाजी कांबळे, हनुमंत मावलकर, बापू जाधव ,सोमनाथ घाडगे ,दादासाहेब दुरगुडे , तुकाराम चौधरी, सुहास चौधरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व झरे पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…