Categories: करमाळा

स्वातंत्र्यानंतर प्रथम एसटी बस नेरले गावात दाखल शेकडो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत- श्री औदुंबरराजे भोसले

करमाळा प्रतिनिधी नेरले हे गाव सुमारे पाच हजार लोकसंख्येचे परंतु देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत लांब पल्ल्याची एकही बस गावात येत नाही.एक मुक्कामी बस रात्री साडे आठला येते व सकाळी सहा ला जाते,नंतर दिवसभर एकही बस नेरले गावाला नाही.त्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यासाठी खूप त्रास होत होता .नेरले वरून गौंडरेला अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेच्या कामासाठी शिक्षणासाठी जातात तसेच आवाटी सालसे निमगाव कोळगाव हिसरे हिवरे येथून देखील अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेचे कामासाठी कोळेगाव प्रकल्पाकडे जाण्यासाठी गौंडरे येथे येतात नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तसेच नागरिकांना कुर्डूवाडी येथून रेल्वेने सोलापूर पुणे मुंबई इतर ठिकाणी जाण्यासाठी व करमाळा येथे शासकीय कामासाठी येणे जाण्यासाठी एसटीची अत्यंत गरज होती .त्यामुळे करमाळा कुर्डूवाडी बस हिसरे कोळगाव निमगाव गौंडरे नेरले वर वरकुटे बारलोणी मार्गे कुर्डूवाडी व त्याच मार्गे परत करमाळा अशी अनेक वर्षे ग्रामस्थांची मागणी होती .त्याप्रमाणे दि.26/08/2024 रोजी बस सुरू करण्यात आली.त्यामुळे नेरले गौंडरे निमगाव हिवरे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.त्यामुळे अधिकारी कर्मचारी व पत्रकार बंधूचे विशेष आभार नागरिकांच्या वतीने मानले व निमगाव गौंडरे नेरले येथे शेकडो नागरिकांनी उत्साहात बसचे स्वागत केले .नागरिकांनी बसने प्रवास करावा अशी विनंती,नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक श्री औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago