करमाळा प्रतिनिधी ब्राह्मण महिला संघ करमाळा च्या वतीने उत्साहात श्रावण रंग कार्यक्रम संपन्न झाला.ब्राह्मण महिला संघाच्या वतीने “श्रीराम मंदीर ” किल्ला विभाग येथे “श्रावण रंग ” हा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी महिलांनी पंचमी चा फेर धरून पारंपारिक गाणी गायिली . पारंपारिक मंगळागौरीचे खेळ खेळण्यात आले व फुगड्या , झिम्मा इत्यादी पारंपारिक खेळ खेळण्यात आले . यावेळी बहुसंख्य महिला पारंपारिक वेशभूषात आल्या होत्या . खेळीमेळी च्या व उत्साहात कार्यक्रम पार पडला
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ब्राह्मण महिला संघाच्या अध्यक्षा सौ निलिमा पुंडे, उपाध्यक्षा सौ स्वाती मसलेकर , सचिव सौ . ज्योती कुलकर्णी , कोषाध्यक्षा सौ . आरती सूर्यपुजारी , सहसचिव सौ . शुभांगी खळदकर व सौ . माधुरी भणगे यांनी परिश्रम घेतले . मा . प्राचार्या माननीय सौ . मीरा रामनवमी वाले व सौ . ज्योती रामनवमी वाले यांचे विशेष सहकार्य लाभले .
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…