Categories: करमाळा

कुंभारगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जालिंदर बापु पानसरे मित्र मंडळाच्यावतीने कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आनंदात साजरा ‌

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जालिंदर बापू पानसरे यांच्या वतीने कुंभारगाव येथे दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षीही कुंभारगाव ता.करमाळा येथे मा श्री जालिंदर बापू पानसरे मित्र परिवाराने आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवाला ग्रामस्थ बालगोपाळ ‌ युवकांचा उदंड प्रतिसाद मिळाला .यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले जेऊर गावचे सरपंच पै,पृथ्वीराज पाटील,उद्योजक रोहिदास ढेरे,राहूल खाटमोडे युवा उद्योजक अक्षय दादा पानसरे यांचेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहकारी महिला भगिनी विद्यार्थी उपस्थित होते . महराष्ट्रासह संपुर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने तरुणाईचा आवडता सण म्हणजे राज्यभर दहीहांडीचा उत्सव साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी घरोघरी श्रीकृष्णाच्या बालस्वरुपाची पूजा केली जाते. भाविक भजन आणि कीर्तन गात या दिवशी उपवास करतात, तसेच भव्य सजावटही करतात. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरा नगरीत देवकीच्या आठव्या अपत्याच्या रूपात कंसाच्या कैदेत झाला. दरम्यान, मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म झाला. यानंतर उत्साह पाहायला मिळाला असून यावर्षीही कृष्ण जन्माष्टमी उत्सव  आनंदात जल्लोषात साजरा करण्यात आला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

19 hours ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

1 day ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

6 days ago