Categories: करमाळा

दत्तपेठ तरुण मंडळ यांच्यावतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तपेठ तरुण मंडळ श्रेणिकशेठ खाटेर मित्र परिवार यांच्या वतीने यावर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी दहीहंडी उत्सव उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. या दहीहंडीचे उद्घघाटन करमाळा तालुक्याचे आमदार . संजय मामा शिंदे ,माजी. आमदार. जयवंतराव जगताप यांच्या हस्ते झाले.या दहीहंडीच्या निमित्ताने प्रमुख आकर्षण दिनेश ममदापुरे यांनी कृष्णा अवतारामध्ये उपस्थित राहुन रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमास जेऊरचे माजी सरपंच राजू शेठ गादिया, पोलीस निरीक्षक विनोद घुगेसाहेब, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, नगरसेवक सचिन घोलप, जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप बलदोटा बोरगावचे सरपंच विनय ननवरे, मकाईचे संचालक अमोल यादव शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, महाराष्ट्र नवनिर्माण जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे स्व बाबुराव गायकवाड प्रतिष्ठानचे सचिन गायकवाड उपस्थित होते.दहीहंडी फोडण्याचा मान छत्रपती शिवाजी मित्र मंडळ (वेळ १० वा., सावंत गल्ली)बोरगाव संघ, नागराज गल्ली, श्रीदेवीचा माळ, मंगळवार पेठ, कानाड गल्ली  यांनी मिळवला. अमोल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व भूषण खुळे विश्वजीत परदेशी संग्राम देशमुख अरुण काका टांगडे, चरण परदेशी प्रज्योत पोळके धनराज महाजन शिवम टांगडे केतन परदेशी कृष्णा यांच्या सहकार्याने दहीहंडी महोत्सव संपन्न झाला . विजेता गोविंदा पथकाला दत्त पेठ तरुण मंडळाच्या वतीने ट्रॉफी व बक्षीस रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. या दहिहांडीसाठी दत्तपेठ तरुण मंडळाचे आधारस्तंभ गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांनी दहीहंडीच्या कार्यक्रम नियोजनासाठी मोलाची मदत सहकार्य केले, यांचेसह अनेक मान्यवरानी भेटी देऊन दहीहंडी उत्सवात आपला सहभाग नोंदवला. यावेळी पोलीस स्टेशन, करमाळा यांनी सहकार्य करून चोख बंदोबस्त ठेवला.
दत्त पेठ तरुण मंडळातील कार्यकर्त्यांच्या हस्ते सर्व सन्माननीय अतिथीचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,अभय महाजन, सचिन भणगे,ओंकार चोपडे, अभिजीत भणगे,अजिंक्य महाजन नितेश देवी, नितिन घोडेगावकर आदींनी भरपूर परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. या उत्सवात शहरातील अनेक राजकीय, सामाजिक, व्यापारी क्षेत्रातील महिला पुरुषांनी दहीहंडी पाहण्यासाठी उपस्थित होते. .

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

20 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

1 day ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

1 day ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

2 days ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

2 days ago