करमाळा प्रतिनिधी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला याबाबत दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांनी व्यक्त केले. करमाळा तहसीलदार शिल्पाताई ठोकडे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले असून शासनाला आपल्या भावना पत्राद्वारे कळवण्याची विनंती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भरत भाऊ आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष किरण फुंदे,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार कार्याध्यक्ष सुजित तात्या बागल,करमाळा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ रोकडे अमोल फरतडे, डॉ गोरख गुळवे तालुका प्रवेक्ता ॲड अजित विघ्ने , राष्ट्रवादी युवा नेते अजिंक्य पाटील रामचंद्र जगताप, आकाश आवताडे रामराजे डोलारे उपस्थित होते. याबाबत दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला, हे अत्यंत वेदनादायी आहे. केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो, हे अनाकलनीय आहे. या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा च्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत. सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभा करण्याची मागणी करण्यात आली आहे.