Categories: करमाळा

एकलव्य आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांच्या 31 ऑगस्ट रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

करमाळा प्रतिनिधी युवा एकलव्य प्रतिष्ठान व एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. रामकृष्णजी माने साहेब (भाऊ) यांच्या 61 व्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये आयोजित करण्यात आले आहे.प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे , पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने ,पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब ज्येष्ठ पत्रकार बाबुराव हिरडे यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद‌ झिंजाडे माजी नगरसेवक कन्हैयालाल देवी नगरसेवक संजय सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुका अध्यक्ष संतोष भैय्या वारे ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले डॉक्टर बाबुराव लावंड संतोष जाधव बालाजी चांदगुडे डॉक्टर तुषार गायकवाड डॉक्टर गणेश राऊत यांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिर होळीत कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एडवोकेट संग्राम रामकृष्ण माने यांनी दिली आहे.एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा माने-जाधव परिवार युवा एकलव्य प्रतिष्ठान करमाळा यांच्यावतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तसंकलन सहकार्यः मल्लिकार्जुन ब्लड सेंटर, सोलापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे रक्तदान शिबिर सत्कार समारंभाचा कार्यक्रम.
एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा, क्रांतिसंग्रामनगर MIDC शेजारी, करमाळा येथे संपन्न होणार आहे.तरी या रक्तदान शिबिरास सत्कार समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड संग्राम माने यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

20 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

1 day ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

1 day ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

2 days ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

2 days ago