Categories: करमाळा

जेऊर मध्य रेल्वे स्टेशनवर हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस यांना थांबा देण्याबाबत भारतीय जनता पार्टीच्या महिला उपाध्यक्षा रश्मी दीदीं बागल यांच्या मागणीला यश

करमाळा (प्रतिनिधी)- जेऊर मध्य रेल्वे स्टेशनवर हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस यांना थांबा देण्याबाबत केलेल्या विनंतीला यश मिळाले असून पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांना आपले शिफारस पत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचित केले असून थोड्या दिवसात या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना जेऊर येथे निश्चितपणे थांबा मिळणार असल्याची माहिती भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका रश्मीदिदी बागल यांनी आज येथे दिली यावेळी भाजपाचे जिल्हा युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती देताना रश्मीदीदी बागल म्हणाल्या की जेऊर हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्टेशन असून येथे प्रवाशांची सातत्याने वर्दळ असते जेऊर रेल्वे स्टेशनशी आसपासच्या सुमारे 50 ते 60 गावांचा संपर्क येतो विविध गावचे प्रवासी विद्यार्थी व्यापारी शासकीय अधिकारी दररोज पुणे, सोलापूर, दौंड, कुर्डूवाडी, बेंगलोर इंदोर, भोपाळ, नागपूर, भुसावळ ,मुंबई, चेन्नई, तिरुपती, गुंटक्कल या ठिकाणी कामानिमित्त ये जा करत असतात त्यांच्या सोयी करता हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस यांना जेऊरला थांबा मिळण्याबाबत प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी होती या मागणीचा विचार करून या संदर्भात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना पत्र देऊन विनंती केली होती. त्यानुसार आजच पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी केलेल्या विनंतीनुसार जेऊर येथे रेल्वे थांबा देणेबाबत उच्चस्तरावरून कार्यवाही करावी अशी शिफारस केली असून लवकरच जेऊर रेल्वे स्टेशन येथे हुतात्मा एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस यांना निश्चितपणे थांबा मिळण्याबाबत रेल्वे मंत्र्यांचा हिरवा कंदील येईल अशी माहिती रश्मी दिदी बागल यांनी यावेळी दिली. या मागणीबाबत अनेक वेळा रेल्वे प्रवाशांची आंदोलने झाली आहेत विनंती व निवेदन दिलेली आहेत. या पत्रामुळे प्रवाशांना आता या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांची सुविधा मिळणार असून प्रवाशांची कामे वेळेत व लवकर पूर्ण होतील. व त्यांच्या मागणीची लवकरच पूर्तता होईल असे शेवटी रश्मी दिदी बागल म्हणाल्या.
*(*चौकट) जेऊर मध्ये रेल्वे स्टेशनवर प्रवासी विद्यार्थी व्यापारी या सर्वांनी केलेल्या मागणीप्रमाणे हुतात्मा एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस यांना थांबा मिळण्याबाबत आमच्या नेत्या भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका आदरणीय रश्मी दिदी बागल यांनी पालकमंत्र्यांना शिफारस पत्र दिले होत याबाबत पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांना जेऊर रेल्वे स्थानकावर या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबत तातडीने पत्र दिले असून भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माननीय रश्मी दिदी बागल यांच्या मागणीचा उच्च स्तरावरून विचार होऊन याबाबत लवकरच जेऊर येथे दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळेल या संदर्भात नेत्या आदरणीय रश्मी दिदी बागल यांनी अथक प्रयत्न केले त्याला आज यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया भाजपा जिल्हा युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी येथे बोलताना दिली.*

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

13 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

22 hours ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

23 hours ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

2 days ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

2 days ago