Categories: करमाळा

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या घटनादत्त आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी 9 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आमरण उपोषण

सोलापूर (दि. 30) – धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या घटनादत्त आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी दि . 9 सप्टेबर पासून राज्यव्यापी “आमरण उपोषण ” होणार असल्याची माहिती सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज उपोषण आंदोलनाचे राज्य समन्वयक प्रा.शिवाजीराव बंडगर यानी दिली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद याना आज या आशयाचे निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी बंडगर बोलत होते.
याबाबत अधिक माहिती सांगताना प्रा बंडगर म्हणाले की ,
साठ वर्षा पासून धनगर समाज सनदशीर मार्गाने आरक्षण अंमलबजावणीची मागणी करत आहे. परंतु प्रत्येक सरकारने आश्वासना पलिकडे काही दिले नाही. म्हणून धनगर जमाती मधे असंतोष पसरलेला आहे. विध्यमान राज्य सरकार ने आता तरी तात्काळ आरक्षण अंमलबजावणीचा जी आर काढावा या साठी पंढरपूर येथे येत्या दि 9 सप्टेबर पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.माजी नगरसेवक चेतन नरोटे म्हणाले की , पंढरपूर येथील उपोषणापूर्वी 1 सप्टेपासून जेजूरी येथून आरक्षण जागर यात्रा निघणार असून ती 11 तालुक्यातून फिरून पंढरपूर ला येणार आहे.सामाजिक कार्यकर्ते अमोल कारंडे म्हणाले दि ,9 सप्टेबर पासून सुरू होणार्या उपोषण आंदोलना दरम्यान राज्यभरातील धनगर बांधव पंढरपुरात दाखल होणार असून आषाढी चे स्वरूप येणार आहे.माउली हळणवर म्हणाले की ,पंढरपूर येथील शिवतीर्थ मैदानावर या उपोषण आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत.अर्जुन सलगर यांनी तमाम जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले.यावेळी सुनील बंडगर, निमीषा वाघमोडे , गंगाधर वाघमोडे ,देवीदास पाटील, काका पाटील ,सुभाष म्हस्के ,देवेंद्र मदने,सिद्धारूढ बेडगनूर , अतुल गावडे ,यशवंत नरूटे , यलगुंड सातपुते ,राम वाकसे ,उमेश काळे ,मधुसूदन बरकडे, महेश गुंठे ,श्रीमंत हाके ,गणपत करे , यतीन देशमुख, बबलू गुंडे, गणपत कटरे ,सिद्धेश्वर सोलंकर, सदाशिव सलगर, तात्या बिचकुले ,योगेश मोटे ,बाळासाहेब वाघमोडे ,पंडीत सातपुते आदी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

10 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

13 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago