करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने युवकाच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार मिळवून देऊन त्यांचे जीवन आत्मनिर्भर करण्यासाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी नोकरी महोत्सवामध्ये व्यक्त केले .प्राध्यापक रामदास झोळसर फाउंडेशन करमाळा यांच्यावतीने करमाळा येथील विकी मंगल कार्यालय येथे शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील 45 कंपन्यांनी सहभागी झाल्या होत्या . या मध्ये ७५४ युवक युवतीने मुलाखत दिली असून ३४४ उमेदवारांची नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे. त्या युवक युवतींना अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर ,सचिवा मायाताई झोळ मॅडम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब जगताप सर, दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव मायाताई झोळ मॅडम, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील,जी आर बी सोल्युशनचे गुरुदेव अलुरकर,आरती गवंडी, प्रा. रामदास झोळ सर यांचे बंधू आदिनाथ सहकारी साखर कारखाना माजी संचालक नवनाथ बापू झोळ ,अनुरथ झोळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, शिवसेना शहरप्रमुख पत्रकार संजय शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते गणेश मंगवडे, तालुका उपाध्यक्ष भिमराव ननवरे, घारगावचे माजी सरपंच संजय सरवदे, स्वाभिमानी कामगार संघटना तालुका अध्यक्ष सुहास काळे पाटील , तालुका उपाध्यक्ष बापु वाडेकर,भरत गुंड,,भैरवनाथ सुरवसे , भोसेचे सरपंच प्रितम सुरवसे,भाग्यश्री गरड मॅडम प्रशांत नाईकनवरे श्रीकांत साखरे पाटील ,गोपीनाथ पाटील सर, लक्ष्मण दुरंदे,महेश बोराडे निलेश शिंदे,मारूती निमगिरे,पत्रकार जयंत दळवी, प्रा. राजेश गायकवाड, दिनेश मडके, सुनील भोसले, विशाल घोलप प्रफुल्ल दामोदरे, सूर्यकांत होनप, किसन कांबळे , सिध्दार्थ वाघमारे, नंदकिशोर वलटे,विशाल परदेशी उपस्थित होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके ,युवा नेते गणेश मंगवडे , घारगावचे माजी सरपंच संजय सरवदे श्रीकांत साखरे पाटील यांनी मनोगत व्यक्त प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या रोजगार मिळवून देण्याच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.नोकरी महोत्सवाचे उद्घघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दिपप्रज्वलन करून करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ संगीता खाडे मॅडम सुत्रसंचालन रणजीत शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ मायाताई झोळ मॅडम यांनी केले .करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रस्ते पाणी वीज आरोग्य या प्रश्नाबरोबरच रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी व्यावसायिक शिक्षण काळाची गरज असून त्यासाठी करमाळा तालुक्यातील शहराजवळ असणाऱ्या देवळाली येथे मोठे शैक्षणिक संकुल उभा करणार असल्याचे प्रा .रामदास झोळ सर यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून करमाळा शहर तालुक्याबरोबरच करमाळा, परंडा,राशीन ,जामखेड परिसरातील युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशन आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सवाचे करमाळा तालुकावासियांकडून विशेष कौतुक होत आहे . *चौकट –प्रा रामदास झोळसर फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवामध्ये प्राध्यापक रामदास झोळसर यांचे थोरले बंधू आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक नवनाथ बापू झोळ अनुरथ झोळ यांनी नोकरी महोत्सवाला भेट देऊन प्राध्यापक रामदास झोळ सर ,सौ.मायाताई झोळ मॅडम यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत. या निमित्ताने संपूर्ण झोळ परिवार आता एकत्र आला असून कौटुंबिक सलोखा झाल्याने प्रा .रामदास झोळ सर यांना कुटुंबाची चांगली शाबासकीची साथ पाठबळ मिळाले आहे*. *प्राध्यापक रामदास जवळ फाउंडेशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या नोकरी महोत्सवात ७५४ युवक युवतींनी सहभागी झाले होते. ३४४ युवक युवतींना नोकरी मिळाली आहे*