*गेल्या वर्षी याच दिवसात दिल्लीत ऐतिहासिक पेन्शन रॅली झाली…सरकारने त्यावेळी त्याकडे तितके गांभीर्याने लक्ष दिले नाही…लाखो लोक सरकारी कर्मचारी येवून वोट फॉर ओपीएसचा नारा देत होते आणि त्या नाऱ्याच्या परिणामांची दखल आज घ्यावी लागली… परंतु ही नव्याने आलेली योजना प्रथमदर्शनी NPS योजनेचे सुधारित रूप आहे.शासनाने आता NPS शासन हिस्सा 18 टक्के करत निश्चित नवीन NPS घ्यावी का UPS याचा विकल्प निवडावा हा पेच निर्माण केला आहे.कारण 25 वर्षे महिन्याच्या पगाराच्या 28% रक्कम पेन्शन योजनेसाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवून एक निश्चित रक्कम UPS(Unified pension scheme) पेन्शन मध्ये घ्यावी की NPS(National pension scheme) मधून अधिक रक्कम मिळेल हा गोंधळ निर्माण होणार.मूळ OPS (old pension scheme) या मागणी पासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न नाही ना?? याचा विचार ही करायला हवा….*
सध्या प्राथमिक माहिती नुसार कशी असेल नवीन पेन्शन UPS योजना
• जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या बेसिक पगाराच्या किमान 50 टक्के पेन्शन नक्कीच मिळेल.
• जर कर्मचाऱ्याने 10 वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन मिळेल.
• सध्या कर्मचाऱ्यांचा 10 टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा 14 टक्के हिस्सा आहे. मात्र यापुढे केंद्र सरकार 18 टक्के हिस्सा असेल.
• 1 जानेवारी 2004 नंतर रुजू झालेल्या परंतु सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही नवीन योजना लागू होईल.
• कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक निवडण्याचा पर्याय असेल.
या चळवळीत अनेक वर्षे काम करणाऱ्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याला या योजनेबद्दल तातडीने मत व्यक्त करताना एकच सांगायचे आहे…आमची मागणी जुनी पेन्शन योजनेची आहे..योजनेचे नाव सरकारने कोणतेही द्यावे.फक्त त्यासाठी सेवेत असताना जो पगार मिळतो त्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम पेन्शन योजनेसाठी कपात करू नये हे नवीन योजनेचे मूळ असायला हवे…पण पुन्हा शासन हिस्सा वाढवून देवून योजेनेवर महिन्याला कर्मचारी सेवेत असेपर्यंत 30 ते 35 वर्ष वेतनाच्या 28 टक्के खर्च करण्यापेक्षा सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्याला पूर्वापार चालत असलेल्या धोरणानुसार पेन्शन द्यायला हवी.
नुकतेच लोकसभेत सरकारने पेन्शन योजनेबाबत कोणताही विचार सुरू नसल्याचे बोलले होते. पण आज केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना मंजूर केली.हे होऊ शकले केवळ आपल्या एकजुटीने… जुनी पेन्शनच्या आंदोलनासाठी आपल्या तालुक्याच्या,जिल्ह्याच्या ठिकाणी, त्याचबरोबर मुंबई, नागपूर,दिल्ली मध्ये येणारे बंधू भगिनी यांच्या एकजुटीचे हे यश आहे…NMOPS या आपल्या देशपातळीवर काम करणाऱ्या संघटनेचे नेतृत्व करणारे विजयकुमार बंधू,वितेश खांडेकर या नेतृत्व करणाऱ्या मंडळींचा त्याग आहे…आता आपली ही वज्रमूठ अधिक घट्ट करूया… *जुनी पेन्शनची रेल्वे दूर गेली म्हणणाऱ्यांनी आज NPS च्या रेल्वेची चेन ओढली आहे… पण आपल्याला यूपीएससी रेल्वेत बसायचे नाही… आपण पुन्हा एकदा ओपीएस ची रेल्वे स्टेशन वरून सोडायला लावायची आहे..त्यासाठी नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत संघर्ष करण्याची तयारी आपण सर्वांनी ठेवू…*शासकीय कर्मचाऱ्यांना हव्या असणाऱ्या जुन्या पेंशन साठी 15 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डी येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या महाअधिवेशनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा नेते श्री तात्यासाहेब जाधव यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…