करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील स्वार्थी व लबाड पुढाऱ्यांनी ठेकेदार व आपली बगलबच्चे मोठे करण्याचे राजकारण करून सर्वसामान्यांची घोर फसवणूक केली यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाणावर करमाळा विधानसभा लढवून भगवा फडकवणारच असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केला आहे.
यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी मनोज राऊत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद फंड भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी,शिवसेनेचे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे,उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील शहर प्रमुख संजय शीलवंत,महिला आघाडी उपाध्यक्ष ज्योतीताई शिंदे
शिवसेना ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश करचे युवासेना जेऊर शहर प्रमुख माधव सूर्यवंशी वैद्यकीय कक्ष प्रमुख नागेश शेंडगे
आधी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना महेश शेवटी म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणून प्रत्येक बहिणीला भाऊ म्हणून आधार दिला आहे
करमाळा तालुक्यात 46000 लाडकी बहिणीची नोंद झाली असून यापैकी 34000 बहिणींच्या खात्यावर पैसे गेले आहेत
अजून किमान 25 ते 30 हजार लाडक्या बहिणीची नोंदणी बाकी आहे.त्यांना या हप्त्यात पैसे आले नाहीत त्यांना पुढील हप्त्यात थेट 4500 जमा होणार आहेत.
वयाश्री योजनेमार्फत प्रत्येक वृद्धाला तीन हजार रुपये दिले जात आहेत.एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी करमाळ्यातील शिवसेनेचा आमदार निवडून जाणे गरजेचे आहे त्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना जो लाभ मिळाला आहे. ते लोक शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे.यावेळी प्राचार्य मिलिंद फंड यांनी तडाखे बंद भाषण करून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या अफवाला बळी पडू नका जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीला महिना दीड हजार मिळणार उलट हा आकडा मेहनत 3000 पर्यंत जाईल त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले आहे.यावेळी नवीन 1300 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली.शिवसेनेच्या वतीने यापूर्वी जवळपास 2700 बांधकाम कामगारांना लाभ देण्यात आला आहे.
++++
वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून तालुक्यातील रुग्णांना जवळपास दोन कोटी रुपयांची मदत झाली आहे .अडचणीच्या काळात सर्वसामान्यांना धावून जाणारी नेतृत्व म्हणून महेश चिवटे आज सर्वसामान्यांचा आधार झाले आहेत. यामुळे त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी व उपस्थित महिलांनी आजपासूनच कामाला लागावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे यांनी केले
++++
एका घरात दोन तास कपडे धुणे भांडी केल्यानंतर महिना आम्हाला पाचशे रुपये मिळतो.आज आम्हाला 3000 रुपये मिळाले असून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत
ही सर्व कृपा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या असून
करमाळा तालुक्यातील या योजनेचा लाभ घेणाऱ्या 42000 महिला एकनाथ शिंदे यांचे उमेदवार महेश चिवटे यांनाच मतदान करणार असा विश्वास महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष सुनीता गोडगे यांनी व्यक्त केला आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…