करमाळा प्रतिनिधी
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी तलावात सोडण्यात आल्याची माहिती नेरलेचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी दिली.
उजनीचे ओव्हर फ्लोचे पाणी दहिगाव उपसा सिंचन योजने मार्फत साडे, सालसे, वरकुटे, नेरले या परिसराला सोडावे तसेच नेरले तलाव भरावा या मागणीसाठी दि. २३ ऑगस्ट रोजी अळसुंदे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. पाणी सोडण्यात आल्याने आंदोलनाला यश आल्याचे भोसले यांनी सांगितले.
दहिगाव योजनेचे पाणी नेरले तलावात येण्यासाठी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी कुकडी डावा कालवा उपविभागाचे अभियंता आवताडे,सोहम कांबळे यांना नेरले तलाव भरण्याची सूचना केल्या होत्या.
पाणी सोडण्यात आल्याने समाधान आहे. पोलिसांनी ४० आंदोलकांवर रस्ता अडवण्याचे कारण देत खोटा गुन्हा दाखल केला. आतापर्यंत तालुक्यात कोणत्याही आंदोलनानंतर असे झाले नाही. कोणाच्यातरी सांगण्याने गुन्हे दाखल करण्यात आले.
-औदुंबरराजे भोसले, माजी सरपंच
सोहम कांबळे यांना नेरले तलाव भरण्याविषयी सूचना केल्या होत्या. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता तलावासाठी पाणी सोडण्यात आले. या पाण्याचे पूजन भोसले यांच्यासह राणा महाराज वाघमारे, जोतिराम घाडगे, सरपंच संजय गुरव प्रा. शहाजी घाडगे, युवा नेते चंद्रकांत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…