करमाळा प्रतिनिधी, समाजातील वंचित घटकासाठी सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांनी उभारलेले कार्य आदर्शवत आहे. समाजात अजूनही अनेक घटक हे विकासाच्या प्रवाहात आलेले नाहीत. विकासापासून दूर असलेल्या घटकांना न्याय देण्यासाठी माने हे कार्य करत असताना त्यांच्या सामाजिक कार्याला आवश्यक ते सहकार्य व मदत नेहमीच करत राहणार आहे. असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले.भटके विमुक्त जाती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, एकलव्य आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण माने यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेत सत्कार समारंभ, रक्तदान शिबीर व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. शिंदे बोलत होते.यावेळी पद्मश्री, उपराकार लक्ष्मण माने, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेचे तालुकाध्यक्ष संतोष कुलकर्णी, नाभिक समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी, गयाबाई बहुद्देशीय समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष किसन कांबळे, महेश वैद्य, धनंजय शिंदे, प्रकाश माने, अंकुश जाधव, डॉ. गणेश राऊत, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे आदि उपस्थित होते.यावेळी उपस्थितांच्या वतीने आमदार शिंदे यांच्या हस्ते माने यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना उपराकार लक्ष्मण माने यांनी, गेली पंचवीस वर्षे रामकृष्ण माने यांनी उभारलेली शैक्षणिक चळवळ ही महत्वाची आहे. त्यांच्या प्रयत्नाने कित्येक मुले शिक्षणाच्या वाटेवर आल्यामुळे त्यांची प्रगती होत राहिली. पारधी समाज गुन्हेगारीपासून दूर होवून स्थिर आयुष्य जगण्याचा प्रयत्न करु लागला. असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी खूप शिकावे. भटक्या विमुक्त, आदिवासी नागरिकांनी चोरी आणि भीक या गोष्टीपासून दूर राहून कोणताही छोटा असला तरी व्यवसाय करावा. असे आवाहन केले. यावेळी पत्रकार येवले यांनी माने, यांचा जीवनप्रवास संघर्षमय राहिला आहे. त्यांनी संघर्षावर मात करुन सामाजिक क्षेत्रात कार्य उभारले. असे स्पष्ट केले.सत्काराला उत्तर देताना माने यांनी, १९९४-९५ पासून सामाजिक कार्य सुरु केले. बिनचेहऱ्याच्या माणसांना चेहरा देण्याचा प्रयत्न केला. अजुनही भटक्या समाजातील नागरिकांना स्थैर्यत्व येणारी उत्पन्न देणारी साधने नाहीत. उदरनिर्वाहाच्या अडचणी आहेत. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे कार्य असेच कायम राहिल. समाज कामातून समाधान मिळत आहे. असे सांगितले. तसेच आमच्या मतांचे पारडे जिकडे तो उमेदवार आमदार होतो. हा गेल्या काही विधानसभा निवडणुकांचा अनुभव आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या कामाची पद्धत आवडली आहे. आता यापुढील काळात त्यांच्यासोबत काम करु. आणि पुन्हा त्यांना आमदार करु. असे स्पष्ट करत माने यांनी यावेळी आ. शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला.दरम्यान सुरुवातीला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, विनय ननवरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र बोधे, रवींद्र वनारसे उपस्थित होते. ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ऍड. बाबुराव हिरडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष वारे, उद्योजक बालाजी चांदगुडे, अशोक चव्हाण, डॉ. बाबुराव लावंड, डॉ. रोहन पाटील आदिनी शुभेच्छा व्यक्त केल्या. मल्लिकार्जुन ब्लड सेंटरच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. याप्रसंगी आश्रमशाळेत आयोजित विविध गुणदर्शन स्पर्धेतील विजेत्या मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी पत्रकार दिनेश मडके, नरेंद्रसिंह ठाकूर, प्रमोद पोळ, बाबा माने, बाळासाहेब माने, बिलाल मदारी, उमर मदारी, औदुंबर पवार, शांताराम माने, बळीराम माने, श्रेयश खडके, कृष्णा भागवत, सुयश शिंदे, रामदास जाधव, सर्पमित्र प्रशांत भोसले, दिपक कांबळे आदिंसह भटके विमुक्त संघटनेचे कार्यकर्ते, आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत युवा एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संग्रामदादा माने यांनी केले. प्रास्तविक विठ्ठल जाधव यांनी तर सुत्रसंचलन किशोरकुमार शिंदे यांनी केले. आभार मुख्याध्यापक अशोककुमार सांगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक भास्कर वाळुंजकर, विलास कलाल, कुमार पाटील, विद्या पाटील, प्रल्हाद राऊत, अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उमेश गायकवाड, सैदास काळे, वंदना भालशंकर, दिपाली माने यांनी परिश्रम घेतले. युवा एकलव्य प्रतिष्ठान व एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा यांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
–