Categories: करमाळा

गोविंदपर्व गुळ कारखाना थकीत शेतकरी ऊस बिलाचा प्रा. रामदास झोळ सर यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसुन, आम्ही “दीड” महिन्यात बिल देण्यासाठी कटीबद्ध- श्री लालासाहेब जगताप सर

 

करमाळा प्रतिनिधी, “गोविंदपर्व” गुळ कारखाना राजुरी, येथील शेतकरी थकीत ऊस बिलाचा व प्रा. रामदास झोळसर यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसुन, आम्ही येत्या ” दीड” महिन्यात बिल देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे मत गोविंदपर्व कारखान्याचे संचालक श्री. लालासाहेब जगताप सर यांनी आज ०४ संप्टेंबर रोजी करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. गोविंदपर्व गुळ कारखाना हा शेतकरी हितासाठी राजुरी येथे सुरू करण्यात आला होता. यामध्ये कारखाना सुरळीतपणे चालवण्यासाठी जावई प्रा. रामदास झोळ सर आणि कन्या सौ मायाताई झोळ मॅडम यांनी वेळोवेळी सहकार्य करण्याचे काम केले.

गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये ऊसाचे प्रमाण कमी असल्याकारणाने सदर गळीत हंगामात फक्त २३३४८ टन गाळप झाले होते. त्यातील काहींचे रुपये २०००/- प्रमाणे बिले अदा केलेली आहेत तर कांहीं शेतक-यांचे रुपये १५००/- प्रमाणे बिले अदा केलेली आहेत. उर्वरित ५००/- रुपये प्रमाणे सुमारे ८० ते ९० लाख रक्कम देणे बाकी आहे. तसेच कारखान्याची वाहतूकदार वाहन मालकाकडून उचल येणे बाकी आहे. आमची बँकेकडे सध्या ५० एकर जमीन तारण आहे. त्यातील स्वमालकीची काही जमीन विक्री करून आम्ही रक्कम देणार असल्याचे लालासाहेब जगताप सर यांनी सांगितले आहे. बँकेचे आमचे सेटलमेंट झालेले असून आम्ही लवकरच बिल देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकीय रंग आणण्याचे प्रयत्न चालू आहे. कारखाना तोट्यात असल्याने बंद आहे, बँकेचे सेटलमेंट करून शेतकऱ्यांना बिल देणार आहोत. आम्ही सर्व शेतकऱ्यांना एक हप्ता दिलेला आहे. तसेच वेळोवेळी ज्या शेतकऱ्याने मुलांच्या शिक्षणासाठी किंवा काही अडचणीच्या वेळी थेट माझ्याशी संपर्क साधला त्यांची काही बिल मी स्वतः अदा केलेली आहेत. वरील राहिलेले पैसे किरकोळ असून स्वतःच्या मालकीची काही एकर जमीन विकुन बिल देणार आहोत. शेतकऱ्यांऐवजी काही वेगळ्या गोष्टीत स्वारस्य असणान्या व्यक्तींना ऐन विधानसभेच्या वेळेस शेतकऱ्यांच्या बिलाची आठवण झाली आहे. प्रा. रामदास झोळ सर यांचा याच्याशी कसलाही संबंध नाही. आम्हाला शेतकऱ्याचे पैसे बुडवायचे नाहीत. आतापर्यंत एकाही व्यक्तींने आमच्याकडे तक्रार केलेली नाही. केवळ विधानसभेला प्रा. रामदास झोळ सर निवडणूक लढवणार असल्याने राजकीय वैमनस्याच्या भूमिकेतुन व केवळ ते आमचे जावई असल्याने विनाकारण त्यांना यात ओढण्याचा प्रयत्न काही राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांच्या हस्तकामार्फत चालू आहे. केवळ ८० ते ९० लाख रुपये देणे आहे. करमाळा तालुक्यातील राजुरी येथील गोविंदपर्व कारखाना उर्वरित असणारे बिल दिड महिन्यात देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

•चौकट – गोविंद पर्व ॲग्रो  गुळ कारखान्याचे शेतकऱ्याचे उर्वरित बिल दीड महिन्यामध्ये देणार असल्याचे लालासाहेब जगताप सर यांनी सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करत असून गोविंदपर्व बरोबरच करमाळा तालुक्यातील आदिनाथ, मकाई, भैरवनाथ, कमलाई साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची, कामगार, वाहन मालकांचे पैसे त्वरित द्यावे तसेच शेतकरी, कामगार, वाहन मालकांचया नावावरती कारखानदारांनी ऊचलेली कर्जे त्वरित भरारीच अशी शेतकरी कामगार हिताची आमची भूमिका असून त्यांनी वेळेत पैसे न दिल्यास व कर्जाची रक्कम न भरल्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

 

saptahikpawanputra

Recent Posts

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

18 hours ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

1 day ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

2 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

2 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

2 days ago