Categories: Uncategorized

राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून आहे-राजा माने Ntv न्युजचा 22 वर्षपूर्ती सोहळा अहमदनगरमध्ये जल्लोषात

करमाळा प्रतिनिधी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखला जाणारा पत्रकार आज खऱ्या अर्थाने या समाज माध्यमामुळेच जणसामान्यांपर्यंत पोहोचत आहे,जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावपातळीवरच्या वंचित शोषित आणि पीडितांचा बुलंद आवाज बनला आहे. ही आहे डिजिटल इंडियाची डिजिटल पत्रकारिता.. काळाची आवश्यकता.महाराष्ट्राची आघाडीची वृत्तवाहिनी ntv न्युज मराठीचा 22 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित सोहळ्यात बोलताना महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा माने यांनी बोलताना आपले मत व्यक्त करत पत्रकाराणा मार्गदर्शन केले.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजा माने हे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विराजमान होते तर खासदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, जेष्ठ विधिज्ञ ऍड सुभाष काकडे,सुप्रसिद्ध व्याख्याते संजय कळमकर,अहमदनगर प्रेस क्लब माजी अध्यक्ष नंदकुमार सातपुते ,डिजिटल मीडिया सचिव महेश कुगांवकर आणि ntv न्युज चे सर्वेसर्वा संपादक इकबाल शेख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
टीव्हीचॅनल्स ची जागा इंटरनेटने घेतली आणि इंटरनेटवर सोशल मीडियाने कब्जा केला आहे, तर ‘ब्रेकिंग न्यूज’ची जागा सोशल मीडियातील ‘स्टेटस अपडेट’ने घेतली आहे.मोबाइलफोनच्या क्रांतिकारी प्रसारामुळे इंटरनेटने टीव्ही माध्यमाला झपाट्याने मागे टाकण्यास सुरुवात केली आहे .आज देशातील 100 टक्के कुटुंबांकडे टीव्ही नाहीत, पण मोबाइल फोन प्रत्येक व्यक्तीकडे आहेत.हिच आहे बदलत्या डिजिटल इंडियाची डिजिटल पत्रकारिता.. आणि आपण डिजिटल युगाच्या अशा काळात आहोत, जिथे आपल्यावर खुप मोठी जबादारीपण आहे ही जबाबदारी ntv news मराठी खुप निष्ठेने आणि निष्पक्षरित्या पार पाडत आहे याचा संबंध महाराष्ट्राला अभिमान आहे असे प्रतिपादन राजा माने यांनी व्यक्त केले.

saptahikpawanputra

Recent Posts

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 hours ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

14 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

1 day ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

1 day ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago