Categories: करमाळा

सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी 282.75 कोटी निधीस मंत्रिमंडळाची मंजुरी-आमदार संजयमामा शिंदे


करमाळा प्रतिनिधी
आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शिखर समितीची बैठक झाली .या बैठकीमध्ये उच्चाधिकार समिती ने मान्यता दिलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन आराखड्याविषयी चर्चा होऊन त्याला अंतिम मंजुरी देण्यात आली. लवकरच त्याचा शासन निर्णय निघणार आहे. मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या तसेच करमाळा तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळण्याचा मार्ग आता खुला होणार असल्याची प्रतिक्रिया आ.संजयमामा शिंदे यांनी दिली. या पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार साहेब यांचे मोलाचे योगदान असल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल तसेच येथून होणारे स्थलांतर ही थांबेल. त्यामुळे उजनी जल पर्यटन 190 कोटी 19 लाख, कृषी पर्यटन 19 कोटी 30 लाख, विनयार्ड पर्यटन 48 कोटी 26 लाख, धार्मिक पर्यटन 25 कोटी असा एकूण 282.75 कोटीचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

चौकट – एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प हा पथदर्शी प्रकल्प…
जिल्ह्यात संपूर्ण जगातील पर्यटकांना जल, कृषी, विनयार्ड व धार्मिक पर्यटनाचा अनुभव देणे हा या एकात्मिक पर्यटन प्रकल्पाचा आत्मा व यु. एस. पी. देखील आहे. यासाठी प्रकल्पातून जिल्ह्यात एकात्मिक पर्यटन सर्किट विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने जिल्ह्यात वेगवेगळी पथदर्शी उदाहरणे (कृषी पर्यटन, कृषी मॉल, जल पर्यटन ई बाबतची मॉडेल्स) उभी राहतील की, जी पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील उद्योजकांना पर्यटन क्षेत्रातील विविध संधी दर्शवतील व यासारखे उपक्रम एक व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रेरणा देतील. यामुळे जिल्ह्यात पुढील 8-10 वर्षात पर्यटन उद्योगात मोठी आर्थिक गुंतवणूक होऊन विकासाची प्रकिया वेग धरेल व एकंदरीत स्थानिक व जिल्ह्यावासियांचे जीवनमान उंचावेल.
एकात्मिक पर्यटन सर्किटमध्ये उजनी धरणातील जल पर्यटन हे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असेल. पर्यटकांना यासोबतच येथे धरणाच्या जलाशयाचा भाग, सभोवतालील निसर्गरम्य परिसर, जल क्रीडा उपक्रम, विविध देशी तसेच विदेशी पक्षी, ईत्यादीचे नैसर्गिक सौंदर्य न्याहाळता येईल. पुढे सर्किट मध्ये परिसरातील कृषी पर्यटन केंद्रे, धार्मिक स्थळे, विनयार्ड पर्यटन, तलाव, किल्ले, वारसा स्थळे यांना भेटी देता येतील. पर्यटकांना साधारणत: आठवडाभर पर्यटन सर्किटमध्ये असलेल्या विविध स्थळांना (जल, धार्मिक, कृषी, नैसर्गिक विनयार्ड पर्यटन स्थळांना) भेटी देऊन पर्यटनाचा आस्वाद घेता येणार आहे. निश्चितच यामुळे स्थानिक पातळीवर पर्यटन पूरक उद्योग वाढतील, मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल व यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होऊन जिल्ह्याची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढण्यासाठी गती मिळणार आहे.

चौकट –
कमलाभवानी मंदिर विकासासाठी मिळणार 5 कोटी …

सोलापूर जिल्ह्यातील श्री कमलादेवी मंदिर- करमाळा, श्री सिद्धेश्वर मंदिर- सोलापूर, श्री शिवपार्वती मंदिर व शिवसृष्टी, अकलूज, श्री नागनाथ मंदीर, वडवळ, ता. मोहोळ आणि श्री सिद्धेश्वर मंदिर, माचणुर ता.मंगळवेढा येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा, माहिती फलक, स्वच्छतागृह व विश्रांतीगृह, बैठक व्यवस्था, निवारा शेड, पदपथ, पेव्हर ब्लॉक, कचराकूंडी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ई. त्यासाठी रक्कम रुपये 25 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

11 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

20 hours ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

21 hours ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

1 day ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

1 day ago