करमाळा प्रतिनिधी- भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघ संचालिका रश्मी दीदी बागल व दिग्विजय बागल यांनी जी कामे जिल्हा नियोजन मंडळातून सुचित केली आहेत त्यांना निश्चितपणे प्राधान्याने झुकते माप देऊन करमाळा माढा विधानसभा मतदारसंघासाठी भरघोस निधी दिला जाईल, असे अभिवचन पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी दिले. असून राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून करमाळा माढा विधानसभा मतदारसंघात भाजपा निश्चित भरारी घेत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी आज येथे व्यक्त केले. याबाबत अधिक बोलताना श्री बागल म्हणाले की आज पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांची सोलापूर येथे विश्रामगृहावर भेट घेऊन करमाळा माढा विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून विविध विकासकामांबाबत निधी मिळणे बाबत मी स्वतः व आमच्या नेत्या माननीय रश्मी दीदी बागल यांनी शिफारस पत्रे दिली असून त्या संदर्भात आज सोलापूर येथे सविस्तर चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी करमाळा माढा विधानसभा मतदारसंघासाठी जी विकास कामे आपण सुचित केली आहेत त्याकरिता जिल्हा नियोजन मंडळातून निश्चितपणे झुकते माप दिले जाईल. भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा रश्मीदीदी बागल व युवा नेते दिग्विजय बागल यांनी केलेल्या शिफारशींचा योग्य सन्मान ठेवून विकास कामासाठी निश्चितपणे आपण स्वतः बारकाईने लक्ष देऊन जास्तीत जास्त निधी दिला जाईल असे ठोस अभिवचन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापूर येथे दिले. यावेळी करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून करमाळा माढा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष निश्चितपणे भरारी घेईल व मतदार संघाच्या विकासाबाबत कोणत्याही अडचणी येणार नाहीत असा आशावाद यावेळी दिग्विजय बागल यांनी व्यक्त केला. यावेळी मकाईचे संचालक सतीश बापू निळ, आशिष गायकवाड,सचिन घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.