करमाळा प्रतिनिधी: करमाळा शहर व तालुक्यात गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
करमाळा शहरात आतापर्यंत ३० गणेश मंडळांनी तर तालुक्यात ९२ गणेश मंडळांनी नोंदणी केल्याचे करमाळा पोलिस स्टेशनचे निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले. १५ गावांत एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविण्यात येत आहे. करमाळा शहरात गणेशोत्सव हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करत असल्याचे चित्र वर्षानुवर्षांपासून पाहायला मिळते. मुस्लिम बांधव गणेशोत्सवात सक्रिय सहभागी असतात. अनेक गणेश मंडळांच्या तयारीत मुस्लिम बांधव पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच, करमाळकर गणेशोत्सवाच्या माध्यमातून हिंदू- मुस्लिम एकतेचा संदेश देतात.एकापेक्षा जास्त गणेश मंडळे आहेत त्या सर्व मंडळांना शांततेत उत्सव पार पाडण्याच्या सूचना दिल्या असल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले आहे करमाळा शहरात सर्वच गणेश मंडळांकडून सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करण्यावर भर दिला जात आहे. करमाळा शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील जेऊर, केम, कंदर, कोर्टी, केत्तूर, वीट येथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ग्रामीण भागात देखील गणेशोत्सवानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण या उपक्रमांवर भर दिला जाणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात सहा पोलिस अधिकारी व ५० कर्मचारी बंदोबस्तासाठी करमाळा शहरात व ग्रामीण भागात तैनात करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या सुरवातीच्या दिवसापासून गणेश विसर्जनापर्यंत करमाळा शहरात प्रत्येक चौकात पोलिस बंदोबस्त राहणार असल्याचे सांगितले आहे. करमाळावरील शहर व तालुक्यात लहान मोठे मंडळांनी आप आपल्या गल्लीत गावात गणरायाची प्रतिष्ठापणा केली आहे. मूर्तिकाराच्या दुकानापासून बँड पथकाच्या तालावर युवकांनी मिरवणूक काढत गुलालाची उधळण करत आपापल्या गल्लीत गणरायाची प्रतिष्ठापणा केली आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी लेझीम झांज पथकाच्या तालावर युवकांनी मिरवणूक काढत प्रतिष्ठापणा केली होती सर्वत्र ऊत्साही आनंदाचे वातावरण होते. यावेळी शहरातील सर्व रस्ते गजबजले होते. ग्रामीण भागात काही ठिकाणी लेझीम झांज पथकाच्या तालावर युवकांनी मिरवणूक काढत प्रतिष्ठापणा केली होती सर्वत्र ऊत्साही आनंदाचे वातावरण होते. . गणरायाचे विविध साहित्य खरीदी करण्यासाठी घरातील महिला मंडळ तसेच लहान मोठे नागरिक मुलांनी गर्दी केली होती. यावेळी करमाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. फुलांचा भाव वधारला
बाप्पाची आरास, आरतीसाठी फुले, हार यासाठी फुलांची आवश्यकता भासतेच. त्यामुळे गणपती आगमनाच्या पहिल्याच दिवशी फुलांचा भाव वधारल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी वरूण राजाने कृपा केल्याने सर्वांनी गणरायाचे उत्साहात आनंदात स्वागत केले आहे.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…