Categories: करमाळा

किल्ला विभाग येथे मानाचा तिसरा गणपती लोकमान्य टिळक तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमीत्त मोफत नेत्रतपासणी व मोफत चष्मे वाटप

करमाळा प्रतिनिधी किल्ला विभाग येथे मानाचा तिसरा गणपती लोकमान्य टिळक तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमीत्त मोफत नेत्रतपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर शिबिराचे उद्घाटन डॉ. निलेश मोटे यांच्या हस्ते व यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. सदर शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून ५७३ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतलेला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सागर गायकवाड यांनी दिली. शिबिरासाठी लागणारी सुसज्ज अशी संपूर्ण यंत्रणा मंडळाच्या वतीने उपलब्ध करण्यात आली होती. तसेच शिबिरास्थळी येणाऱ्या नागरिकाना मंडळातील सदस्यांच्या वतीने यथायोग्य सहकार्य करण्यात येत असल्याने नागरिकामधून समाधान व्यक्त केले जात होते.
सदर शिबिरासाठी मंडळातील उपाध्यक्ष अनिकेत चोरगे, सचिव गणेश शिंदे, खजिनदार अभिजीत कारंडे, मिरवणूक प्रमुख वासुदेव ढोके, कार्याध्यक्ष भोलेनाथ ननवरे, गणेश पवार, कमलेश तोडकर, शिवराज तोडकर, योगेश जोशी, शुभम ननवरे यांचे सह सर्व सदस्य उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

8 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

17 hours ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

18 hours ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

1 day ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

1 day ago