करमाळा प्रतिनिधी. करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रथम वर्ष वाणिज्य (कॉमर्स) मध्ये प्रवेश घेण्यासाठी गुणवत्ता यादीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये बी. कॉम. भाग 1 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम महाविद्यालयाचा प्रवेश फॉर्म भरावयाचा आहे. सोबत इयत्ता 12 वी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व जातीचा दाखल्याची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. गुणवत्ता यादी तयार करताना आरक्षणाचा, इनहाऊसचा (Y.C.M. विद्यार्थी) व गुणवत्तेचा निकष लावला जाणार आहे. यामध्ये 120 विद्यार्थ्यांना पहिल्या अनुदानित तुकडीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. दुसरी तुकडी ही विनाअनुदानित असणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी:-.
प्रवेश फॉर्म घेणे – दिनांक 3/08/2020 पासून
फॉर्म जमा करणे – दिनांक 17/08/2020 पर्यंत (ऑफीस वेळेत)
गुणवत्ता यादी प्रसिद्ध – दिनांक 20/08/2020
गुणवत्ता यादीनुसार दिनांक 21/08/2020 ते 29/08/2020 पर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. तरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन मा. प्राचार्य यांनी केले आहे.
संपर्क मोबाईल नंबर डॉ. विजयराव बिले मो. 9421023265.
करमाळा प्रतिनिधी १५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५०…
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…