गणरायाच्या आगमनानिमित्त गणेश उत्सवाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव येथे आज रोजी घारगावच्या आदर्श माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी सरवदे यांचेकडून श्री गणेश आरती संग्रह पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सौ लक्ष्मी सरवदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या गणेश उत्सव हा बुद्धीचा दाता असलेल्या श्री गणेशाचा सण आहे समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून गणेश उत्सवात विद्येची देवता असलेल्या गणराया चरणी हार, फुले, मोदकासह वह्या, पेन, पेन्सिल व शैक्षणिक साहित्य गणेश भक्तांनी अर्पण करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सरपंच आशा काकू देशमुखे, उपसरपंच दत्तात्रय मस्तुद, माजी सरपंच लोचना काकू पाटील, माजी सरपंच अनिता भोसले, मा.उपसरपंच सतीश बापू पवार ग्रामपंचायत सदस्या कविताताई होगले माजी सरपंच रामलीग अण्णा देशमुखे माजी सरपंच बबन बारस्कर, नवनाथ देशमुखे व विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक वर्ग आजी माजी सरपंच शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या AI डेटा सेंटर आणि विविध ऊर्जा प्रकल्पांविरोधात युवक…
सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…
करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…