Categories: करमाळा

करमाळा बाजार समितीत उडदाचे लिलाव सुरळीत सुरू , तब्बल २५००० क्विंटलची आवक -उपसभापती शैलजा मेहेर

करमाळा प्रतिनिधी करमाळा बाजार समितीत उडदाचे लिलाव सुरळीतपणे सुरू असून मंगळवारी ८००० क्विंटल इतकीआवक होवून ६५०० ते ८००० पर्यंत उडदाला दर मिळाला असून चालू हंगामात तब्बल २५००० क्विंटल आवक झाल्याची माहिती बाजार समितीच्या उपसभापती सौ शैलजा मेहेर यांनी दिली आहे ..करमाळ्याचे माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांच्या सक्षम नेतृत्वाखाली करमाळा बाजार समितीचे कामकाज अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून
करमाळा बाजार समितीमध्ये विक्रीस आलेल्या शेतमालाचे लिलाव उघडपद्धतीने शेतकऱ्यांच्या समक्ष शेतमालाची प्रतवारी करून केले जातात. शेतमाल विक्रीस शेतकऱ्यास लिलावातील दर मान्य असल्यास शेतकऱ्याची संमती घेतली जाते व त्यानंतर त्वरित मापे व २४ तासाच्या आत त्यांनी विक्री केलेल्या शेतमालाची पट्टी दिली जाते. यावर बाजार समितीचे कडक नियंत्रण आहे. शेतमालाचा भाव बाजार समिती ठरवत नाही. FAQ दर्जाच्या शेतमालाला हमीभावापेक्षा जादा दर दिला जाईल याकडे बाजार समितीचा कटाक्ष आहे. NON-FAQ दर्जाचा शेतमाल शेतकऱ्यांच्या संमतीनेच विक्री करणेबाबत आडते व्यापाऱ्यांना बाजार समिती प्रशासनाकडून सूचना दिलेल्या आहेत.
चालू खरीप हंगामामध्ये करमाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास २३५०० हेक्टर इतक्या क्षेत्रावर इतक्या क्षेत्रावर उडीदाची लागण झाल्यामुळे व योग्य वेळी पाउस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उडीदाचे उत्पादन होऊन आवक मार्केट यार्डमध्ये सुरु झालेली आहे .चालू हंगामातील उडीदाच्या बाजारभावाचे अवलोकन केले असता प्रतवारीनुसार किमान ६००० पासून ८७०० पर्यंत प्रति क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे. रोजच्या सरासरी दराचा विचार करिता हमीभावाने दर उडीदाला मिळत आहेत. आसपासच्या बाजार समित्यांसह राज्यभरातील बाजार समित्यांमधील आवक व दराचे अवलोकन केले असता करमाळा बाजार समितीत उडदाला चांगला दर मिळत असल्याचे दिसून येत आहे . मार्केट यार्डमधील आडते,खरेदीदार व्यापारी व हमाल तोलारांची संख्या याचा विचार करिता उडीदाच्या आवकेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने लिलाव व मापे या प्रक्रीयेस थोडा विलंब होत असला तरी रात्री उशिरापर्यंत संबंधित सर्व घटक शेतमाल विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्याची यथाशक्ती कसोशिने प्रयत्न करीत असल्याचे देखील सौ. मेहेर यांनी सांगितले .

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

9 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

17 hours ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

18 hours ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

1 day ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

1 day ago