करमाळा प्रतिनिधी
दि. 5 सप्टेंबर रोजी यशदा पुणे येथे रेशीम संचालनालयाच्या वतीने रेशीम रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले.7 जिल्ह्यातील 21 शेतकऱ्यांना रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन 2022-23 मध्ये 1 एकरामध्ये सर्वाधिक उत्पन्न घेतलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांना रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे ,वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव श्रद्धा कोचरेकर, सहाय्यक संचालक डॉ.कविता देशपांडे, राज्याचे कृषी संचालक सुनील बोरकर, जिल्हा रेशिम विकास अधिकारी पुणे चे संजय फुले, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, अधीक्षक अविनाश खडस व इतर अधिकारी उपस्थित होते .रेशीम शेती ही अपारंपारिक व नावीन्यपूर्ण उद्योग असुनही प्रवीण वीर यांनी यश मिळवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय फुले यांनी तर रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी आभार मानले.
चौकट –
2018 साली रेशीम व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला अपयशही आलं .तालुक्यांमध्ये रेशीम व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार झालेला नसल्यामुळे मार्गदर्शनही मिळत नव्हते, परंतु जिल्हा रेशीम कार्यालय सोलापूर यांच्याशी जोडलो गेल्यानंतर आमच्या रेशीम व्यवसायाचा कायापालट झाला.जिल्हा रेशीम अधिकारी श्री विनीत पवार साहेब व त्यांचे सहकारी यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आम्ही भरघोस रेशिम उत्पन्न घेवू शकलो.
– श्री प्रवीण पांडुरंग वीर.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…