करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपालिकेचा कारभार रामभरोसे चालू असुन कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करमाळा शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. एक तर मागील वर्षी उजनी धरण फक्त 60 टक्के भरले होते त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यामध्ये प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. टँकरने विकत पाणी घेऊन नागरिकांनी दिवस काढले आहेत.यंदाच्या वर्षी मात्र 100% उजनी भरूनही करमाळा नगरपालिकेचा कारभार नियोजन शून्य असल्यामुळे नागरिकांना एक दिवसाड पाणी येण्याची नुसते आश्वासन कागदावर राहिले आहे. नळाला पाणी येते ते पण अर्धा तास पाण्यामध्ये एवढी अस्वच्छता आहे की प्रत्येक नळ धारकाला पोटदुखीमुळे साथीच्या आजारांनी आठवड्यातून एकदा तरी दवाखान्यात जावे लागत आहे. पाणी फिल्टरची सुविधाही कार्यक्षम नसल्याने साथीचे आजार बळावले आहेत. पाणी बिल महिन्याचे येत असुन दहा दिवस सुध्दा पाणी पुर्ण दाबाने एक तास पण मिळत नाही.दरवेळी तांत्रिक अडचणी काळ वेळेनुसार ठरलेले आहेत आहेत.मोटार बिघडलेली असणे . दहिगावध्ये लाईटचा प्रॉब्लेम ,पाण्याची लेवल न झाल्याने पाणी पुरवठा बाबतची तांत्रिक कारणे राखून नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती प्रशासनाने नागरिकांची केली आहे. करमळ्या शहरातील नागरिक सुद्धा फक्त तोंड देखले बोलून दाखवत आहेत. नगरपालिकेच्या अकार्यक्षम कारभारावर कुणीही बोलण्यास तयार नाही. प्रशासक असल्याने नगरसेवक याबाबत भूमिका घेण्यास तयार नाही. रस्त्याची दुरवस्था शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य सर्वत्र प्रचंड प्रमाणात पसरले असून डेंगूची साथ चालू असतानाही नाकातली ची स्वच्छता नेहमीच होत आहे. डासाचे निर्मूलन करण्यासाठी जंतूनाशक फवारणी गटारीची नियमित स्वच्छता केली जात नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने करमाळा नगरपालिकेला कोणी वाली उरला आहे का विरोधक फक्त नावालाच उरले आहे हम सब साथ साथ है तू किसको जनतेची फिकर है चंदा बाटके सबको फिरसे चुनकर आयेंगे झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए अशी भावना सर्वांची झाली असल्यामुळे करमाळा नगरपालिकेची परिस्थिती रामभरोसे अशी झाली आहे. लवकरात लवकर कृत्रिम पाणीटंचाईचा प्रश्न न सोडवल्यास यापुढे पाणीपट्टी घरपट्टी न भरण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला असून प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.