Categories: करमाळा

सकल मुस्लिम समाज करमाळाच्या वतीने 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीत जामा मशीद करमाळा मधून पुष्पगुष्टी होणार-जमीर सय्यद

करमाळा प्रतिनिधी
सकल मुस्लिम समाज करमाळा च्या वतीने 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील गणरायाच्या विसर्जन मिरवणूकी वेळी जामा मशीद करमाळा मधून पुष्पगुष्टी होणार असल्याची माहिती जामा मशीद ट्रस्टचे विश्वस्त तसेच सकल मुस्लिम समाज अध्यक्ष जमीर सय्यद यांनी  दिली आहे.
याबाबत सय्यद पुढे बोलताना म्हणाले आमचे प्रेरणास्थान व मुस्लिम समाजाला नवी दिशा नवा विचार देणारे माझे आदरस्थान वडील पत्रकार स्व सय्यद भाई पत्रकार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आम्ही गेली एकोंचाळीस वर्षांपासून एकदाही खंड न पडता अविरत चालू आहे. सदरचा मानवतेचा सलोखा शहर व तालुक्यात कायमस्वरूपी टिकून राहावा या महत्त्वकांक्षेने सकल मुस्लीम समाज कित्येक वर्षापासून जामा मशीद मधून गणरायाच्या विसर्जन मिरवणूक वेळी करमाळा शहरातील प्रत्येक गणेश उत्सव मंडळाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून प्रत्येक मंडळाच्या सन्माननीय अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सन्मान करत असतो याचाच एक भाग म्हणून या वर्षी देखील अशाच पद्धतीने आम्ही सदरचा मानवतेच्या एकात्मतेचा , परिवर्तनाचा उपक्रम यावर्षी देखील आम्ही राबवित असल्याची माहिती श्री सय्यद यांनी दिली सदरचा सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश संपूर्ण राज्यभरात राबवला जावा असेही आवाहन महाराष्ट्रातील बांधवांना केले.
तसेच गणपती विसर्जनामध्ये चोख बंदोबस्त ठेवणारे पोलीस बांधव व त्यांचे वरिष्ठ अधिकारी , तहसीलदार व तहसील मधील उपस्थित कर्मचारी बंधू या सर्व शासकीय कर्मचारी व अधिकारी पदाधिकाऱ्यांचा येथे सन्मान जामा मस्जिद ट्रस्ट,व सकल मुस्लिम समाज करमाळा भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन बांधवांच्या वतीने दरवर्षी न चुकता केला जातो.
या बैठकीला उपस्थित सकल मुस्लीम समाज चे अध्यक्ष जमीर सय्यद, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन चे मार्गदर्शक समीर शेख, आझाद शेख उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट, रमजान बेग ( सचिव डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन ) सुरज शेख (सचिव रहनुमा ट्रस्ट) , सोहेलभाई पठाण (राष्ट्रवादी युवक अध्यक्ष) जहाँगीर बेग, आलिम पठाण, शाहीद बेग, इकबाल शेख, कलंदर शेख,आरबाज बेग, राजु बेग, शाहरुख नालबंद, सुपरान शेख, बबलु पठाण .कलीम शेख, आरीफ पठाण.कय्युम मदारी.ईरफान सय्यद.अय्युब मदारी.अरबाज शेख.इ मुस्लीम बांधव उपस्थित होते .

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

5 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

14 hours ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

15 hours ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

1 day ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

1 day ago