Categories: करमाळा

प्राध्यापक रामदास झोळसर मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये “मराठा सेवक(हक्काचा माणूस)” यांची नाव नोंदणी करता लागले कामाला


करमाळा प्रतिनिधी,
मराठा संघर्ष योद्धा मा. श्री. मनोज जरांगे-पाटील यांनी दिनांक १०/०९/२०२४ रोजी माढा, करमाळा, भूम-परंडा व बार्शी तालुक्यातून मराठा समन्वयकांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये प्रत्येक गावातील कमीत कमी २० मराठा सेवक (हक्काचा माणूस) यांची नाव नोंदणी करण्याबाबत चर्चा झाली असून, असे मराठा सेवक गावागावातून तयार करायचे आहेत, की जे मराठा समाजाच्या विविध अडचणी जसे की मराठा समाजाच्या नोंदी, जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी करण्यास मदत करणे, शेती, शिक्षण, वैद्यकीय अडचणी बाबत मदत करणे, तसेच सामाजिक अडचणी व इतर समस्या सोडण्यासाठी काम करतील.
सदर बैठकीसाठी करमाळा तालुक्यातून दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर तसेच स्वाभिमानीचे श्री. गणेश मंगवडे, प्रशांत नाईकनवरे तसेच प्रा. संजय जगताप सर हे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मा. श्री मनोज जरांगे-पाटील यांच्या बैठकीस हजर होते.
प्रा. झोळ सर यांनी लगेच तातडीने मराठा बांधवांची बैठक घेऊन, करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात फिरून मराठा सेवकांसाठी अर्ज भरून आजपासून नाव नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. तरी इच्छुक मराठा बांधवांनी आपले नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

5 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

14 hours ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

14 hours ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

1 day ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

1 day ago