Categories: करमाळा

गजराज ड्रायक्लिनर्सचे मालक रावसाहेब सावरे यांचा प्रामाणिकपणा कपड्यामध्ये आलेले सावंत कुंटुबाचे पैसे केले परत.

. करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील गजराज ड्रायक्लिनर्समधून गेल्या ४० वर्षांत अनेकवेळा ग्राहकांनी ड्रायक्लिनला टाकलेल्या कपड्यांच्या खिशामध्ये मिळालेले रोख रक्कम, सोने, चांदी, मोबाईल, महत्त्वाचे डॉक्युमेंट हे सावरे बंधूनी ग्राहकांना संपर्क करून प्रामाणिकपणे परत केले आहेत. असाच आज दि.१२ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा असाच प्रत्यय समोर आला आहे.
करमाळा शहरातील माजी नगरसेवक संजय भगवान सावंत आणि त्यांचे वडील भगवान सावंत (नाना) यांचे ड्रायक्लिनसाठी आलेल्या कपडे नेहमी प्रमाणे कपड्यांचे खिशे चेक करत असताना दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी वडिलांच्या खिशामध्ये ९०० रु तर १२ सप्टेंबर २०२४ रोजी संजय सावंत यांच्या ड्रायक्लीनसाठी आलेल्या पँटचे खिशे चेक करत असताना १८४१० रु रक्कम खिशामध्ये आढळून आली. हे सावरे यांच्या निदर्शनास आले असता ताबडतोब श्री
निदर्शनास आले असता ताबडतोब श्री संजय सावंत यांना फोन करून सांगितले की तुमच्या व वडिलांच्या ड्रायक्लिन साठी टाकलेल्या कपड्यांच्या खिशामध्ये रोख रक्कम आली आहे.
त्यावेळी श्री. सावंत यांना दुकानात बोलावून सावरे यांनी त्यांचे पैसे त्यांना प्रामाणिकपणे परत केले. सावरे यांच्या प्रामाणिकपणा बद्दल माजी नगरसेवक संजय सावंत व सावंत गटाचे कार्यकर्ते यांनी गजराज ड्रायक्लीनर्स चे मालक श्री रावसाहेब सावरे यांचा सत्कार करून सावरे परिवाराचे आभार मानले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

5 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

14 hours ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

15 hours ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

1 day ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

1 day ago