Categories: करमाळा

धनगर समाजाला एस.टी.मधून आरक्षण मिळण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ फाऊंडेशन करमाळा यांच्या वतीने जाहीर पाठिंबा-प्रा. रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी
पंढरपूर येथे धनगर समाज बांधव एस टी मधून आरक्षण मिळावे यासाठी उपोषणास बसले आहेत त्यांची मागणी न्याय असून आपला त्यांच्या मागणीला पाठिंबा असल्याचे पत्र प्रा. रामदास झोळ फाउंडेशन करमाळा यांच्यावतीने पंढरपूर येथील धनगर समाज बांधवांना देण्यात आले.धनगर समाजाला एस.टी.मधून आरक्षण मिळण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ फाऊंडेशन करमाळा यांच्या वतीने जाहीर पाठिंबा-प्रा. रामदास झोळ सर* यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मा. श्री शिवाजीराव पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष रवी गोडगे, गणेश मंगवडे, सुदर्शन शेळके, प्रशांत नाईकनवरे, बापू फडतरे, भीमराव ननवरे, सिद्धेश्वर घुगे, सत्यवान गायकवाड व बापू गायकवाड तसेच फाउंडेशनचे प्रा.संजय जगताप पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या पाठिंबाच्या पत्रामध्ये असे म्हटले आहे की, संपुर्ण भारतामध्ये धनगर समाज हा धनगड या नावाने ओळखला असुन भारतातील अनेक राज्यांमध्ये धनगड समाजाला अनुसुचित जाती (एस.टी) या आदिवासी प्रवर्गातुन आरक्षण दिले जात असुन त्यानुसारच त्यांना शैक्षणिक व नोकरीमध्ये अनेक सवलती मिळतात. आपल्या महाराष्ट्रातच धनगर या नावाने हा समाज प्रचलित असुन त्यांना एन. टी या प्रवर्गातुन आरक्षण दिले जाते. आपण आपल्या उपोषणाने धनगर समाजाला अनुसुचित जाती (एस.टी) या प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी करत असलेल्या मागणीला माझा पाठिंबा आहे. तरी सर्व उपोषणकर्त्यांनी आपल्या तब्यतेची योग्य ती काळजी घेवून उपोषण पार पाडून, आपण उपोषणाद्वारे करित असलेल्या मागण्या महाराष्ट्र शासनाकडून मान्य व्हाव्यात, यासाठी मी सदैव आपल्यासोबत राहुन लढा देणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळसर यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

खोलेश्वर महादेवाला पावसासाठी साकडे नगराध्यक्ष मोहिनी सावंत व नगरसेवक संजय सावंत दाम्पत्याच्या हस्ते पूजा-अभिषेक तीन दिवसांचा धार्मिक उपक्रम

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा शहर व परिसरात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा,…

17 hours ago

आदिनाथचा लिलाव ही तालुक्यासाठी अतिशय दुर्दैवी घटना : संचालक डॉ.अमोल घाडगे

* करमाळा(प्रतिनिधी)- तालुक्यातील सहकाराचे,सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचे मंदिर असलेला आदिनाथ कारखाना,ही शासकीय दरानुसार सुमारे ५०० कोटी…

21 hours ago

सरकार मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी* *स्वरांजली ऑर्केस्ट्रा’च्या सादरीकरणाने मिरवणुकीत रंगत; विविध उपक्रमांनी गणेशोत्सवाची सांगता

करमाळा प्रतिनिधी – सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन मिरवणुकीने…

23 hours ago

सरकार मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दी ढोल-ताशांचा गजर भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप

करमाळा : प्रतिनिधी – सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्साहपूर्ण आणि भक्तिमय…

24 hours ago

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेण्यासाठी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलन करणार: राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे*

करमाळा : प्रतिनिधी – सीना-कोळगाव जलाशयातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या उद्देशाने काही गावांतील शेतीपंपांचा वीजपुरवठा…

2 days ago

स्वर्गीय शिवा नाना कांबळे यांच्या स्मरणार्थ गणेश विसर्जन मिरवणूकीत माणुसकीचा प्रसाद अल्पोपहार व पाणी वाटप

करमाळा : प्रतिनिधी राशीन पेठ येथील स्वर्गीय शिवा (नाना) कांबळे यांच्या स्मरणार्थ गणेश विसर्जन मिरवणुकीत…

2 days ago