करमाळा (प्रतिनिधी)
संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सध्या दीड हजार रुपये मिळत असलेले मानधन पुढील वर्षी तीन हजार रुपये होणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणे गरजेचे आहे त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहणार असल्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे होतील असा विश्वास करमाळा तालुका शिवसेना संपर्कप्रमुख रवी आमले यांनी व्यक्त केला आहे.करमाळा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली संघटन मजबूत करावे असे आवाहन केले आहे. करमाळा येथील लाडकी बहीण योजना प्रसार व अडचणी समजून घेण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला त्यावेळी जे बोलत होते.
++++-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या शासकीय योजनेचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेच्या वतीने अद्यावत करमाळ्यात कार्यालय उभा करण्यात आले असून प्रत्येक योजनेचे ऑनलाईन अर्ज या ठिकाणाहून मोफत भरून दिले जात आहेत लाडकी बहीण बांधकाम कामगार वयोश्री योजना तरुणांसाठी विविध योजनातून कर्ज अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातील कर्ज हे सर्व फॉर्म भरून याचा फायदा लोकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे
+++++
पद्मजा इंगोले
महिला आघाडी जिल्हा समन्वयक
करमाळा तालुक्यात दहा हजार महिलांचे संघटन करण्याची उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून शिवसेना महिला आघाडी काम करत असून सर् सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून तालुक्यातील 118 गावात रोज एक ठिकाणी भेट देणार असल्याचे पद्मजा इंगोले यांनी यावेळी जाहीर केले.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…