Categories: करमाळा

पांगरे ग्रामपंचायत उपसरपंचपदी श्री महेश टेकाळे यांची निवड ॲड दत्तात्रय सोनवणे यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी पांगरे ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री महेश टेकाळे यांची निवड मौजे पांगरे ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री महेश शिवाजी टेकाळे यांची उपसरपंच पदी नुकतीच निवड करण्यात आली ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदासाठीची सभा माननीय सरपंच प्रा. डॉ. सौ विजया दत्तात्रय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यामध्ये केवळ एकच अर्ज आल्याने श्री महेश टेकाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. श्री महेश टेकाळे यांची उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ॲड. श्री दत्तात्रय सोनवणे यांनी केला त्यावेळी श्री सचिन पिसाळ संचालक, श्री मकाई सहकारी साखर कारखाना, श्री गणेश वडणे सदस्य, माजी सदस्य सहदेव दोंड, श्री बाळासाहेब गुटाळ, उपाध्यक्ष वि.का.का.से. सहकारी सोसायटी, श्री येवले भाऊसाहेब, विवेक पाटील, समाधान कांबळे ग्रामसेवक, महेश शेळके, धनंजय गायकवाड, सुशांत वडणे, नाथा काळे, भैरु ढवळे, बाबुराव टेकाळे, पांडुरंग उघडे, गोरख सोनवणे, महादेव गव्हाणे, मच्छिंद्र उघडे, गोपाळ कोळी आदी उपस्थित होते. श्री महेश टेकाळे यांना उपसरपंच कार्यकाळासाठी उपस्थित सर्वांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

22 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago