आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याला आर्थिक अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार -खा.शरदचंद्र पवार

करमाळा प्रतिनिधी.                                   आदिनाथ व मकाई साखर कारखाना शेतकऱ्यांचे कामगारांचे हित जपणारे सहकाराचे मंदिर असुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव उतरल्यामुळे व निसर्गाचा लहरीपणा दुष्काळी परिस्थितीचा फटका या सहकारी साखर कारखान्याबरोबर राज्यातील इतर कारखान्यांना बसल्याने सहकारी साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले असुन करमाळा तालुक्यातील आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याला आर्थिक अडचणीतुन बाहेर काढून  गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे देशाचे नेते खा. शरदचंद्रजी पवार यांनी व्यक्त केले .                                                         देशाचे नेते माननीय खा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुबंई येथे मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय भैय्या बागल यांनी भेट घेतली. मकाई सहकारी साखर कारखाना आणि आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न आपण स्वतः लक्ष घालून सोडवू असे यावेळी  खा.शरदचंद्र पवारसाहेबांनी सांगितले. या भेटीवेळी अनेक विषयावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी सोबत मकाईचे चार्टर्ड अकाउंटेंट जी. एस. थोरात, मकाई सहकारी साखर कारखान्याचे एमडी हरिश्चंद्र खाटमोडे उपस्थित होते…

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

6 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

6 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

12 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago