Categories: करमाळा

वाशिंबेतील भैरवनाथ तरुण मंडळाने गणेशोत्सवानिमित्त राबवला रक्तदान शिबीर,स्पर्धा परीक्षेचा उपक्रम ३७० विद्यार्थ्यांचा स्पर्धा परिक्षेत सहभाग. १११ रक्तदात्यांनी केले रक्तदान

वाशिंबे प्रतिनिधी वांशिबे ता करमाळा येथील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त इयत्ता पहीली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या बुद्धिमत्तेस चालना व वाव देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी व भविष्यातील स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा यासाठी शनिवार दि.१४रोजी वाशिंबे ता करमाळा येथे स्पर्धा परीक्षेचा उपक्रम राबविण्यात आला.यामधील यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र,ट्राँफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या परीक्षेत शरदचंद्रजी पवार विद्यालय वाशिंबे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाशिंबे येथील एकूण ३७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.तसेच भैरवनाथ तरुण मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीरात १११ रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला.रक्तदान करणार्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेट वस्तू देण्यात आली.तसेच गणेशोत्सवानिमित्त दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून विविध सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकीचा संदेश भैरवनाथ तरुण मंडळाने दिला आहे.हे उपक्रम मंडळाच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने पार पडत आहेत.तसेच शरदचंद्रजी पवार विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाशिंबे येथील शिक्षक वृंदाचे ही या उपक्रमास सहकार्य लाभले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

31 mins ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

9 hours ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

10 hours ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

24 hours ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

1 day ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

1 day ago