Categories: करमाळा

केत्तुरला संपूर्ण दारुबंदी साठी महिला सरसावल्या जिल्हा पोलिस प्रमुखांसह दारूबंदी खात्याला दिले निवेदन

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील केत्तुर येथील महिला मंडळांनी दारूबंदी करीता ग्रामसभेचा ठराव संमत करून सक्षमपणे पाऊले उचलली असुन जिल्हा पोलिस अधिक्षक ( ग्रामिण ) श्री अतुल कुलकर्णी यांचेसह दारूबंदी खाते यांना निवेदन सादर केलेले आहे . गावामधे प्रमुख रस्त्यावर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आसपास उघडपणे बेकायदा दारूचे धंदे सुरू आहेत . शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ महिला मंडळींना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे . त्यामुळे तसेच तरुण पिढी यामुळे देशोधडीला लागत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून स्थानिक महिलांनी स्वतः पदर खोचुन संपूर्ण दारू बंदी करणेचा निर्णय घेतला असुन याबाबतची निवेदन देऊन दारू बंदी कमिटी स्थापन केलेली आहे
गावामधे एक देशी दारूचे दुकान असुन देशी दारूचे दुकान देखिल बंद होणे करीता लवकरच महिला मंडळी विशेष ग्रामसभा घेणार आहेत . सर्व दारू विक्रेत्यांना विनंती करून दारू धंदे बंद होणे बाबत कळविणार आहेत.यावेळी  सौ कमल पवार , सौ निर्जला नवले , मुक्ताबाई काटवटे , कमलबाई गुंजाळ , प्रियंका पवार , अरुणा साठे , बेबी कनिचे , सोनाली राऊत , रूपाली पवार वैगेरे महिला निवेदन सादर करताना उपस्थित होत्या.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

19 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago